ETV Bharat / sitara

अश्लील व्हिडिओ शूट करणाऱ्या पूनम पांडेला नवऱ्यासह गोव्यात अटक - पूनम पांडेचा वादग्रस्त व्हिडिओ

गोव्यातील सरकारी जागेत घुसून अश्लील व्हिडिओ शूट केल्याबद्दल वादग्रस्त मॉडेल पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम बॉम्बे याला अटक करण्यात आली आहे.

Poonam Pandey
पूनम पांडे
author img

By

Published : Nov 5, 2020, 5:34 PM IST

पणजी - अभिनेत्री पूनम पांडेने पुन्हा एकदा गोव्यात खळबळ उडवली आहे. ती आणि तिचा पती सॅम बॉम्बे याला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. काणकोन येथील चपोली धरणावर पूनम आणि तिचा नवरा सॅम हे अश्लील व्हिडिओ शूट करीत होते. गोवा सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मालमत्तेमध्ये पूनम पांडे हिने 'अश्लील' फोटोशूट केल्याचा आरोप स्थानिक विरोधी पक्ष गोवा फॉरवर्ड यांनी केला होता.

विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक पोलीस व धरणावरील कर्मचारीही सहभागी होते. पूनम अश्लील हाव भाव करीत असताना त्याचे शूटिंग सॅम करीत होता. त्यांना संरक्षण पोलीस कर्मचाऱ्यांनी दिले होते. यामध्ये सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक (दक्षिण गोवा) पंकज सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २९४ (अश्लीलता) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये पूनम पांडे हिने तिचा नवरा सॅम बॉम्बे याच्यावर काणकोन पोलीस स्टेशनमध्ये प्राणघातक हल्ला, धमकी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.