ETV Bharat / sitara

शाहरुख खानवर लिहिलेली कविता सोशल मीडियावर व्हायरल - आर्यन खानचे क्रूज ड्रग प्रकरण

शाहरुखचा मुलगा आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 7 लोकांसह मुंबई किनाऱ्यावरील क्रूझवर रेव्ह पार्टीच्या आरोपाखाली पकडले होते, त्यानंतर तो 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. या दरम्यान बॉलिवूडमधील सर्व मित्र आणि चाहत्यांनी शाहरुख खानला पाठिंबा दर्शवला आहे.

शाहरुख खान
शाहरुख खान
author img

By

Published : Oct 12, 2021, 4:38 PM IST

मुंबई - अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची बुधवारी क्रूज ड्रग प्रकरणात जामीन मिळावा यासाठी सुनावणी होणार आहे. आर्यन खानच्या अटकेबाबत सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. शाहरुख खानचे चाहते त्याच्या घरासमोर पोस्टर लावून आणि सोशल मीडियावर त्याच्यासाठी पोस्ट लिहून त्याला पाठिंबा दर्शवत आहेत.

दरम्यान, अखिल कात्याल यांची एक कविता खूप व्हायरल होत आहे. यामध्ये त्याने शाहरुख खानबद्दल आपले मत मांडले आहे. ही कविता बॉलिवूड दिग्दर्शक नीरज घायवान यांनी रिट्विट केली आहे आणि स्वतः काही ओळी लिहिल्या आहेत. या कवितेची स्वरा भास्करनेही स्तुती केली आहे.

  • “Bandhan Hai Rishton Mein⁰Kaaton Ki Taarein Hain⁰Patthar Ke Darwaaze Deewaarein
    Belein Phir Bhi Ugti Hain⁰Aur Guchchhe Bhi Khilte Hain⁰Aur Chalte Hain Afsaane⁰Kirdaar Bhi Milte Hain⁰Vo Rishtey Dil Dil Dil Thay”

    Love you @iamsrk! Dil se. https://t.co/nhVTmKpyUE

    — Neeraj Ghaywan (@ghaywan) October 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अखिल कात्याल यांनी हिंदीमध्ये लिहिलेल्या कवितेच्या ओळी अशा आहेत...

'वो कभी राहुल है, कभी राजक भी है

कभी चार्ली तो कभी मॅक्स

सुरिंदर भी वो, हॅरी भी वो

देवदास भी और वीर भी

राम, मोहन, कबीर भी

वो अमर है, समर है

रिजवान, रईस, जहांगीर भी

शायद इसलिए कुछ लोगों के हलक में फंसता है की एक शाहरुख में पूरा हिंदुस्तान बसता है.

स्वरा भास्करने शाहरुख खानला टॅग करून या कवितेसह हृदयाची इमोजी पोस्ट केली आहे.

या कवितेला रिट्विट करताना बॉलिवूडचे दिग्दर्शक नीरज घायवान यांनी लिहिले:

'बंधन है रिश्तों में

काटों की तारें हैं

पत्थर के दरवाजे दीवारें

बेलें फिर भी उगती हैं

और गुच्छे भी खिलते हैं

और चलते हैं अफसाने'

किरदार भी मिलते हैं

वो रिश्ते दिल दिल दिल थे.

लव यू शाहरुख खान दिल से.'

अशा प्रकारे नीरज घायवान यांनी आपले विचार कवितेतून मांडत शाहरुख खानबद्दल आपलकी दाखवली आहे. नीरज घायवानच्या या ट्विटवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. सध्या अखिल कात्यालची कविता सोशल मीडियावर खूप वाचली जात आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह इतर दोघांच्या जामीन अर्जावर बुधवार 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. यापूर्वी सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा - कार्तिक आर्यनचा अजून एक ‘धमाका’, रोमँटिक थ्रिलर 'फ्रेडी' साठी वाढवले १४ किलो वजन!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.