ETV Bharat / sitara

'पीएम मोदी'मुळे आले विवेकचे 'अच्छे दिन', जाणून घ्या कारण

आतापर्यंत विवेकची मुख्य भूमिका असलेल्या एकाही चित्रपटाने ओपनिंग विकेंडमध्ये १० कोटींचा गल्ला पार केला नाही. विवेकचा हा बॉलिवूडमधील कमबॅक यशस्वी ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

'पीएम मोदी'मुळे आले विवेकचे 'अच्छे दिन'
author img

By

Published : May 29, 2019, 9:27 AM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय नुकताच 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने पहिल्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर ११.७६ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे ओपनिंग विकेंडमध्ये इतकी कमाई करणारा हा विवेकच्या करिअरमधील पहिलाच चित्रपट ठरला आहे.

आतापर्यंत विवेकची मुख्य भूमिका असलेल्या एकाही चित्रपटाने ओपनिंग विकेंडमध्ये १० कोटींचा गल्ला पार केला नाही. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेलं यश आणि मोदींची लोकप्रियता याचा फायदा या चित्रपटाच्या कलेक्शनला झाला आहे.

या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल विवेकने प्रेक्षकांचे आभारही मानले आहेत. एकंदरीतच विवेकचा हा बॉलिवूडमधील कमबॅक यशस्वी ठरला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आणखी किती कमाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

ENT 10

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.