ETV Bharat / sitara

सलमान, अक्षय, फरहानसह 38 दिग्गज सेलेब्रिटींना अटक करण्याची मागणी - वकील गौरव गुलाटी

हैदराबाद बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख कथितरित्या उघड केल्याबद्दल टॉलीवुड आणि बॉलिवूडमधील 38 चित्रपट सेलिब्रिटींना अटक करण्याची विनंती दिल्लीतील वकिलांनी एक केस दाखल करुन केली आहे. या बेजबाबदार सेलिब्रिटींना त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सलमान, अक्षय, फरहान
सलमान, अक्षय, फरहान
author img

By

Published : Sep 7, 2021, 4:57 PM IST

नवी दिल्ली - हैदराबाद बलात्कार प्रकरणात पीडितेची ओळख कथितरित्या उघड केल्याबद्दल टॉलीवुड आणि बॉलिवूडमधील 38 चित्रपट सेलिब्रिटींना अटक करण्याची विनंती दिल्लीतील वकिलांनी एक केस दाखल करुन केली आहे. दोन वर्षांपूर्वी हैदराबादच्या बाहेरील भागात एका पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती.

त्यानंतर हिंदी आणि दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील सेलेब्रिटींनी पीडित महिलेची ओळख उघड केली होती. यामध्ये सलमान खान, अक्षय कुमार, फरहान अख्तर, अनुपम खेर, अजय देवगण, रकुल प्रित सिंग अशा दिग्गज बॉलिवूड सेलेब्रिटींचा समावेश होता.

वकील गौरव गुलाटी यांनी दिल्लीच्या सब्जी मंडी पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 228 अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे सेलिब्रिटी बेजबाबदार नागरिक असल्याचा आरोप करत तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गुलाटी यांनी सेलिब्रिटींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - Hbd Radhika : राधिका आपटे लग्नात का नेसली होती जुनी साडी?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.