मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या मैदानावर घाम गाळत आहे. बॅडमिंटनपटू सायना नेहवालची व्यक्तीरेखा साकारणार आहे. यासाठी ती बॅटमिंटनचे धडेही गिरवत आहे.
परिणीतीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती बॅडमिंटन कोर्टात खेळताना दिसत आहे. या चित्रपटाचे शूटींग येत्या ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याचे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
सायना नेहवालचा बायोपिक खूप आधीपासून सुरू होणार होता. यासाठी श्रध्दा कपूरला साई करण्यात आले होते. मात्र तिला डेंग्यूचे निदान झाल्यानंतर तिने हा चित्रपट सोडला होता. त्यानंतर परिणीती यासाठी मेहनत घेताना दिसत आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शन करीत असलेला हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज होणार आहे.