कॅलिफोर्निया - परिणीती चोप्राने शेअर केलेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका पाळीव श्वानासोबत परिणीतीने टाकलेल्या फोटोवर जोरात चर्चा होताना दिसत आहे. इतकेच काय बहीण प्रियांका चोप्राचा नवरा नीक जोनासनेसुद्धा परिणीतीच्या या फोटोवर कमेंट केली आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा पाळीव श्वान कोण? जास्त डोक्याला ताण देऊ नका. या प्रश्नाचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. परिणीतीने टाकलेल्या फोटोत दिसणारी पाळीव श्वान हा प्रियांका चोप्राचा आहे. परिणीतीने या फोटोला एक सुंदर कॅप्शनही दिले आहे. 'बेस्ट गर्ल इन द वर्ल्ड' असे कॅप्शन दिलेला हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'डायना' असे या सुंदर पाळीव श्वानाचे नाव आहे.