मुंबई - अभिनेत्री किर्ती कुल्हारी हिने क्रिमिनल जस्टीस : बिहाईंड क्लोज्ड डोअर्स या वेब सिरीजमधील सहकालाकार पंकज त्रिपाठी यांचे तोंडभरुन कौतुक केले आहे. क्रिमिनल जस्टीसच्या दुसऱ्या भागातील पंकज त्रिपाठींसोबत काम करण्याच्या अनुभवाबद्दल ती म्हणाली की, ते सेटवर अदृष्य वावरत असतात.
कीर्तीने अनु चंद्र नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे, जी संशयित खुनी आहे. तर पंकज त्रिपाठी यांनी वेब मालिकेच्या पहिल्या सत्रापासून वकील माधव मिश्रा ही भूमिका साकारली आहे. शोमध्ये बहुतेक सीन्समध्ये दोघांनी एकत्र काम केले आहे. किर्ती म्हणते की पंकज फारच साधे आहेत आणि ते तुमच्या भोवती असताना किंवा त्यांच्यासोबत काम करताना सोपे जाते.
अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत किर्तीला जेव्हा विचारले की पंकज हे सहकलाकार म्हणून कसे आहेत, तेव्हा ती म्हणाली, "हे जवळपास अदृश्य असल्यासारखे आहे. असे काही लोक असतात जे फक्त उपस्थित आहे हे तुम्हाला माहिती असते आणि त्यांची हजेरी तुम्हाला सेटवर जाणवत नाही. ते एक वातावरणाचा भाग असतात. ते हवेसारखे आहेत...तुम्ही श्वास घेत आहात तितकेच ते सोपे आहे. "
हेही वाचा - ''ही ती कंगना नाही जीला मी ओळखतो'' - अनुराग बासू
खऱ्या आयुष्यात पंकज कसे आहेत त्याबद्दल बोलताना किर्ती म्हणाली, ''त्यांचे हजर असणे तुमच्यासाठी खूप सोपं आहे. ते अशा काही खऱ्या व्यक्तींपैकी आहेत ज्यांच्याकडे बघताना वाटते, 'असे आणखी काही आहे का? की हे खरं आहे? ''
हेही वाचा - ट्रॅफिक जाममुळे 'दुचाकी'वरुन शुटिंगला पोहोचले अनुपम खेर