पॅन-इंडिया स्टार प्रभासचा पॅन-इंडिया चित्रपट ‘राधे श्याम’ यावर्षी ३० जुलै २०२१ ला चित्रपटगृहांत रिलीज होणार होता. परंतु कोरोनाची आलेली दुसरी लाट भयानक होती व पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यामुळेच अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाचे वेळापत्रक कोलमडले ज्यात ‘राधे श्याम‘ चे नावसुद्धा आहे. नुकतीच निर्मात्यांनी ‘राधे श्याम‘ च्या प्रदर्शनाची नवीन तारीख घोषित केली आहे.
वर्षाच्या सुरुवातीला १४ जानेवारीला मकर संक्रांति येते आणि दाक्षिणात्य पोंगल सुद्धा. हाच दुहेरी मुहूर्त साधत पुढील वर्षी याच दिवशी ‘राधे श्याम‘ प्रदर्शित होणार आहे. 'राधेश्याम' आणि प्रभासचे चाहते या दिवसाची आतुरतेने वाट पहात होते. पॅन-इंडिया स्टार प्रभासने आपल्या सोशल मीडियावर या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो एका फॅशनेबल लूक मध्ये यूरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे की ‘राधेश्याम’ येत्या मकर संक्रांती म्हणजेच पोंगलला म्हणजेच १४ जानेवारी २०२२ मध्ये प्रदर्शित होईल.
प्रभासने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "तुम्ही सर्वांनी माझी रोमँटिक गाथा पाहण्यासाठी जास्त वाट पाहवत नाही, #RadheShyam, या चित्रपटाची जगभरासाठी नवीन रिलीज तारीख आहे - 14 जानेवारी, 2022!"
हा चित्रपट अनाऊन्स झाल्यापासूनच त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती आणि अनेकांचे असे म्हणणे आहे की हा चित्रपट त्या वर्षीच्या सर्वात मोठया चित्रपटांपैकी एक असेल. प्रभासचे चाहते निश्चितच या प्रदर्शन तारखेच्या घोषणेने आनंदित झाले आहेत. चित्रपटाचे अजूनही काही पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत त्यामधून प्रभास ‘लवरबॉय इमेज’ मध्ये दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जवळपास दशकभराने प्रभास रोमांटिक शैलीत परतत असून यामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांची नवी जोड़ी पाहायला मिळणार आहे.
राधेश्याम एक बहुभाषी चित्रपट असून गुलशन कुमार व टी-सीरीज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही यूवी क्रिएशन्सची निर्मिती असून याचे निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे. हा चित्रपट १४ जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - जिया खान मृत्यू प्रकरण : 8 वर्षे प्रलंबित खटला सीबीआय कोर्टात चालणार