ETV Bharat / sitara

अखेर 'पल पल दिल के पासचा' ट्रेलर प्रदर्शित, करण-साहेरच्या प्रेमाची झलक - अॅक्शन

सहलीसाठी गेलेल्या साहेरला तिथे करण भेटतो. सुरुवातीला एकमेकांसोबत वाद घालणारी ही जोडी काही वेळ सोबत घालवताच एकमेकांच्या प्रेमात पडते आणि या कथेला एक रोमँटिक अँगल येतो.

पल पल दिल के पासचा ट्रेलर प्रदर्शित
author img

By

Published : Sep 5, 2019, 4:42 PM IST

मुंबई - अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून यात त्याच्या अपोझिट नवोदित अभिनेत्री साहेर लम्बा झळकणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर बुधवारीच प्रदर्शित होणार होता. मात्र, मुंबईतील मुसळधार पावसामुळे तो गुरुवारी म्हणजेच आज प्रदर्शित झाला.

हेही वाचा - किकू शारदाच्या चहा कॉफीचं बिल पाहून तुम्हीही व्हाल थक्क, शेअर केली पोस्ट

सहलीसाठी गेलेल्या साहेरला तिथे करण भेटतो. सुरुवातीला एकमेकांसोबत वाद घालणारी ही जोडी काही वेळ सोबत घालवताच एकमेकांच्या प्रेमात पडते आणि या कथेला एक रोमँटिक अँगल येतो. नंतर नेहमीप्रमाणेच त्यांच्या लव्हस्टोरीत खलनायकाची एन्ट्री होते, आणि रोमँटिक करण अॅक्शन कलाकाराच्या रुपात पाहायला मिळतो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'पल पल दिल के पास' हा एक रोमँटिक चित्रपट आहे. सनी देओलनेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सनी देओलनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन चित्रपटाच्या ट्रेलरची लिंक शेअर केली आहे. आता करणच्या या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा - विल स्मिथचा अफाट अॅक्शन असलेला 'जेमिनी मॅन' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.