मुंबई - जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याची प्रक्रिया सरकारच्या वतीने सुरू आहे. यावर अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे, तर काहींनी याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. अशात आता पाकिस्तानी गायक अतिफ असलमची एक पोस्ट समोर आली आहे.
तुम्हा सर्वांसोबत एक मोठी गोष्ट शेअर करताना अतिशय आनंद होत आहे. इंशाअल्लाह, लवकरच आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या प्रवासासाठी निघत आहे. हजला जाण्याआधी मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. मग ते चाहते असो, कुटुंबीय असो किंवा मित्र, जर मी कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मला माफ करा. यासोबतच काश्मीरींसोबत होत असलेला अत्याचार आणि शोषणाचा मी निषेध करतो. अल्लाह काश्मीर आणि जगातील सर्व निष्पापांची रक्षा करो, असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
अतिफच्या या पोस्टनंतर अनेक भारतीयांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. सापाला कितीही दूध पाजलं तरी तो त्याचं विषचं बनवतो, असं म्हणत अनेकांनी त्याला टीकेच्या धारेवर धरले आहे. अतिफनं आतापर्यंत अनेक बॉलिवूडमधील गाण्यांना आवाज दिला आहे.