मुंबई - आज 29 वा वाढदिवस साजरा करणारी बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे एक मनोरंजक अपडेट शेअर केले आहे. वाढदिवसानिमित्य आलियाने 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटातील तिची ईशा या पात्राची ओळख करून दिली आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदा बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दिसणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
इंस्टाग्रामवर आलियाने ब्रह्मास्त्रची एक छोटी पण मनमोहक व्हिडिओ क्लिप शेअर केली. या व्हिडीओमध्ये आलियाच्या व्यक्तिरेखेतील ईशाचे अनेक मूड्स चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. ब्रह्मास्त्र मधील तिच्या ईशाच्या पात्राची ओळख करून देताना आलियाने लिहिले, "मला वाढदिवसाच्या शुभेच्छा! ईशाला भेटण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस आणि चांगला मार्ग याचा विचार करू शकत नाही... अयान माझा वंडर बॉय आहे. मी तुझ्यावर प्रेम करते. धन्यवाद. ! #ब्रह्मास्त्र."
'ब्रह्मास्त्र' या भव्य ट्रायलॉजी चित्रपटाची निर्मिती फॉक्स स्टार स्टुडिओ, करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन, प्राइम फोकस आणि स्टारलाईट पिक्चर्स यांनी केली आहे. चित्रपटाचा पहिला भाग 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. ब्रह्मास्त्रचा दुसरा आणि तिसरा भाग 2024 आणि 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - 'द काश्मीर फाइल्स'बद्दल बॉलिवूडने मौन बाळगल्याने फरक पडत नाही विवेक अग्निहोत्री