मुंबई - बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच तो 'चीट इंडिया' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मात्र, या चित्रपटाला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर इम्रान आता आणखी एका चित्रपटातून आपले नशीब आजमवण्यास सज्ज झाला आहे.
हा चित्रपट 'ईझ्रा' या मल्ल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. मल्ल्याळम चित्रपटाचे दिग्दर्शक जय क्रिश्नन हेच या चित्रपटाचेही दिग्दर्शन करणार आहेत. तर मुंबई आणि मॉरिशसमध्ये चित्रपट चित्रीत केला जाणार आहे. हा एक थ्रिलर चित्रपट असणार आहे.
-
IT'S OFFICIAL... Emraan Hashmi to star in #Hindi remake of #Malayalam supernatural thriller #Ezra... Directed by Jay Krishnan [he directed the original]... Will be shot in #Mumbai and #Mauritius... Produced by Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak, Krishan Kumar and Abhishek Pathak. pic.twitter.com/izIsA14JKB
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IT'S OFFICIAL... Emraan Hashmi to star in #Hindi remake of #Malayalam supernatural thriller #Ezra... Directed by Jay Krishnan [he directed the original]... Will be shot in #Mumbai and #Mauritius... Produced by Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak, Krishan Kumar and Abhishek Pathak. pic.twitter.com/izIsA14JKB
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2019IT'S OFFICIAL... Emraan Hashmi to star in #Hindi remake of #Malayalam supernatural thriller #Ezra... Directed by Jay Krishnan [he directed the original]... Will be shot in #Mumbai and #Mauritius... Produced by Bhushan Kumar, Kumar Mangat Pathak, Krishan Kumar and Abhishek Pathak. pic.twitter.com/izIsA14JKB
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2019
भूषण कुमार, कुमार पाठक, क्रिशन कुमार आणि अभिषेक पाठक या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ईझ्रा' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. अशात आता चित्रपटाचा हिंदी रिमेक प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.