ETV Bharat / sitara

मुन्नाभाईवेळी संजयला वाचल्यानंतर 'संजू'ची निर्मिती, 'संजू' झाला तीन वर्षांचा!

राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि अभिनेता संजय दत्त, रणबीर कपूर अभिनित संजू चित्रपटाला प्रदर्शित होऊन तीन वर्षे झाली. त्यानिमित्ताने राजकुमार हिरानी, अभिनेत्री सोनम कपूर यांनी हा चित्रपट आणि संजय दत्तच्या आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. वाचा ईटीव्ही भारतचा त्याबाबतचा स्पेशल रिपोर्ट...

संजू
संजू
author img

By

Published : Jul 2, 2021, 10:47 PM IST

मुंबई - राजकुमार हिरानी यांची दिग्दर्शनाची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. त्यांचा पहिला चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस'ने अनेक प्रथितयश दिग्दर्शकांना अवाक केले आहे. त्यांची प्रसंगांची मांडणी आणि त्यांनी केलेली व्यक्तिरेखांची ठेवण अप्रतिम होती. या चित्रपटात अभिनेता शाहरुख खान 'मुन्नाभाई'च्या अवतारात दिसणार होता. परंतु, ती भूमिका संजय दत्तने साकारली. ती व्यक्तिरेखा संजयच्या पर्सनालिटीमध्ये इतकी योग्य बसली, की प्रेक्षक आता दुसऱ्या कुणालाही मुन्नाभाई म्हणून बघूच शकणार नाहीत. यात मोठा हात आहे राजकुमार हिरानी यांचा. त्यांच्या अफलातून प्रेझेंटेशनमुळे संजय दत्त आणि मुन्नाभाई अविभाज्य झाले. या चित्रपटापासून संजय दत्त आणि राजकुमार हिरानी यांच्यात इतकी घट्ट मैत्री झाली, की हिरानींना संजय दत्तच्या आयुष्याबद्दल संपूर्णतः कळले.

'संजू' झाला तीन वर्षांचा
'संजू' झाला तीन वर्षांचा

...आणि बनला संजू

त्यानंतर त्या दोघांनी मिळून 'लगे रहो मुन्नाभाई' चित्रपट बनवला. तोही तूफान चालला. हिरानींना संजय दत्तच्या आयुष्यातील नाट्य चित्रपटासाठी खुणवू लागले आणि त्यांनी संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला 'संजू' हा चित्रपट बनवला. जेव्हा हा चित्रपट बनवायचे ठरले, तेव्हा संजय आणि राजू यांच्या संभाषणामधील बनवलेल्या नोंदी हजारेक पानांच्या झाल्या होत्या. त्यातून काही निवडक नाट्यप्रसंग घेऊन 'संजू'ची पटकथा बनवण्यात आली. अभिनेता रणबीर कपूरला जेव्हा संजय दत्तच्या भूमिकेसाठी निवडले होते, तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. परंतु जेव्हा 'संजू'चा 'फर्स्ट लूक' बाहेर आला तेव्हा सर्वचजण, फिल्म इंडस्ट्रीतलेसुद्धा अवाक झाले होते. रणबीरने भूमिकेसाठी घेतलेली मेहनत आणि राजकुमार हिरानी यांचे 'व्हिजन' इतके जबरदस्त निघाले की रणबीर थेट संजूच दिसत होता.

रणबीरला वडिलांची आदरयुक्त भीती

जेव्हा संजू चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित व्हायचा होता, तेव्हा राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा यांनी आधी रणबीरचे वडिल दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांना दाखविला होता. आश्चर्य म्हणजे ऋषी कपूर यांनी आपल्या मुलाला ओळखलेच नाही. इतका तो पडद्यावर संजय दत्तसारखा दिसत होता. ते खूप भावुकही झाले होते. यावेळी बाजूला बसलेल्या पत्नी नीतू कपूरला सांगितले, की 'त्याला हे सांगू नकोस की मी त्याची स्तुती करत होतो. अजून त्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे'. रणबीर कपूरला आपल्या वडिलांबद्दल नेहमीच आदरयुक्त भीती होती. परंतु यावरून कळले असेलच की रणबीर कपूरने 'संजू'साठी केलेले परिवर्तन किती पर्फेक्ट होते.

'एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगलेला माणूस'

२९ जून २०२१ ला 'संजू'च्या प्रदर्शनाला तीन वर्षे झाली. रणबीर व दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह 'बिहाइंड-द-सीन' फोटोसह चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना सोनम कपूरने लिहिले, की 'या चित्रपटाचा भाग होण्याचा अनुभव अविश्वसनीय होता. खरोखर संजू एक माणूस जो एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं जगला'. तर, 'संजूच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले आणि ते आम्ही चिन्हांकित करण्याचा प्रयत्न केला. काही क्षण तर अविश्वसनीय आहेत. परंतु पूर्णतः खरे आहेत. त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एक कथा उभी होती. एक अविश्वसनीय कथा पण विलोभनीय आणि खरी...’, असे संजय दत्तबद्दल आपले मत व्यक्त करताना राजकुमार हिरानी म्हणाले.

संजूच्या आईचे स्वप्न अधुरेच

संजय दत्तला मोठ्या पडद्यावर पाहणे हे त्याची आई नर्गिस दत्त यांचे स्वप्न होते. ते पुरे करण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याला घेऊन 'रॉकी' चित्रपट बनवला होता. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तीन दिवस आधी कॅन्सरग्रस्त नर्गिस दत्त यांनी प्राण सोडला. त्या आघातातून संजू बरीच वर्षे बाहेर पडू शकला नव्हता. दरम्यान, या बायोपिकमध्ये संजय दत्तची समाजात मलीन झालेली प्रतिमा (त्याच्या घरात सापडलेल्या रायफल्स ई.) पुसण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशी टीका झाली होती.

संजूची स्टारकास्ट

प्रदर्शनाची तीन वर्षे पूर्ण झालेल्या 'संजू' या बायोपिकमध्ये रणबीर कपूरसोबत सोनम कपूर, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा, विक्की कौशल, परेश रावल आणि मनीषा कोईराला यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

हेही वाचा - धकधक गर्ल OTT वर: माधुरी दीक्षित झळकणार 'मेरे पास माँ है'मध्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.