मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेत्री कॅटरिना कैफसाठी यंदाची लोहरी खास ठरली आहे. पती विकी कौशलसोबतचा हा पहिलाच लोहरी सणाचा प्रसंग होता. शुक्रवारी पहाटे, कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसाठी नवविवाहित जोडप्याच्या लोहरी उत्सवाची एक झलक शेअर केली आहे.
तिने फोटोंची एक स्ट्रिंग पोस्ट केली आहे. यामध्ये ती विकीसोबत शेकोटीसमोर उभी राहून हसताना दिसत आहे. या प्रसंगी कॅटरिनाने लाल रंगाचा एथनिक सूट परिधान केला होता.
एका फोटो हे जोडपे एकमेकांच्या डोळ्यांत पाहत चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विकीनेही कॅटरिनासोबतचा एक फोटो पोस्ट केला आणि लिहिले, "लोहरीच्या शुभेच्छा." या फोचोत विकी कॅटरिनाच्या खांद्यावर हात ठेवत असल्याचे दिसत आहे.
या फोटोवर चाहत्यांच्या भरपूर प्रतिक्रिया उमटत आहेत. 'सो क्यूट', असे एका युजरने म्हटलंय तर एकाने 'हाये नजर ना लगे', असं म्हटलंय.
9 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकलेल्या विकी आणि कॅटरिनाने इंदूरमध्ये त्यांची पहिली लोहरी साजरी केली. विकी सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी तिथे शूटिंग करत आहे.
हेही वाचा - सांस्कृतिक दहशतवादाचा बळी, किरण माने!