मुंबई - अभिनेता शाहिद कपूर लवकरच 'कबीर सिंग' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अर्जून रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असणार आहे. काही दिवसांपूर्वीच याबद्दलची अधिकृत घोषणा झाली असून आता चित्रपटाचं टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
या पोस्टरमध्ये शाहिद कपूरचा ब्लॅक शेडमधील लूक पाहायला मिळत आहे. मात्र, शाहिदचा संपूर्ण लूक यात दिसत नसल्याने याबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अशात चित्रपटाच्या टीझर प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
-
Teaser on Mon... Teaser poster of #KabirSingh... #Hindi remake of #Telugu smash hit #ArjunReddy... Stars Shahid Kapoor and Kiara Advani... Directed by Sandeep Reddy Vanga... 21 June 2019 release. pic.twitter.com/qGFeXAP8Ur
— taran adarsh (@taran_adarsh) April 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Teaser on Mon... Teaser poster of #KabirSingh... #Hindi remake of #Telugu smash hit #ArjunReddy... Stars Shahid Kapoor and Kiara Advani... Directed by Sandeep Reddy Vanga... 21 June 2019 release. pic.twitter.com/qGFeXAP8Ur
— taran adarsh (@taran_adarsh) April 6, 2019Teaser on Mon... Teaser poster of #KabirSingh... #Hindi remake of #Telugu smash hit #ArjunReddy... Stars Shahid Kapoor and Kiara Advani... Directed by Sandeep Reddy Vanga... 21 June 2019 release. pic.twitter.com/qGFeXAP8Ur
— taran adarsh (@taran_adarsh) April 6, 2019
सोमवारी म्हणजेच ८ एप्रिलला 'कबीर सिंग'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहिद कपूरसोबतच अभिनेत्री कियारा अडवाणीही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. येत्या २१ जुनला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून याला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.