मुंबई - बॉलिवूडची क्वीन कंगना रनौत नेहमीच वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. मणिकर्णिकापाठोपाठ आता ती आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. 'मेंटल हैं क्या', असं या चित्रपटाचं शीर्षक आहे.
हा चित्रपट २९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, आता ही तारीख पुढे ढकलली असून आता २१ जूनला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात राजकुमार राव कंगनाच्या अपोझिट झळकणार आहे. चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर करत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबद्दल माहिती दिली आहे.
-
Kangana Ranaut and Rajkummar Rao... #MentalHaiKya gets a new release date: 21 June 2019... Directed by Prakash Kovelamudi... Produced by Shobha Kapoor, Ekta Kapoor and Shaailesh R Singh. #MentalHaiKyaOn21stJune pic.twitter.com/EyuY4BhLq5
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Kangana Ranaut and Rajkummar Rao... #MentalHaiKya gets a new release date: 21 June 2019... Directed by Prakash Kovelamudi... Produced by Shobha Kapoor, Ekta Kapoor and Shaailesh R Singh. #MentalHaiKyaOn21stJune pic.twitter.com/EyuY4BhLq5
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2019Kangana Ranaut and Rajkummar Rao... #MentalHaiKya gets a new release date: 21 June 2019... Directed by Prakash Kovelamudi... Produced by Shobha Kapoor, Ekta Kapoor and Shaailesh R Singh. #MentalHaiKyaOn21stJune pic.twitter.com/EyuY4BhLq5
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2019
प्रकाश कोवेलामूडी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत तर शोभा कपूर, एकता कपूर आणि शैलेश सिंग यांची निर्मिती असणार आहे. हा चित्रपट सायकोलॉजिक थ्रिलर असणार आहे. कंगना आणि राजकुमारचा नवा अवतार प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.