ETV Bharat / sitara

करिना-अक्षयच्या चाहत्यांसाठी 'बॅड न्यूज', 'गुड न्यूज'च्या प्रदर्शनाची तारीख बदलली - diljit dosanj

अक्षय आणि करिनाने याआधीही तशन, बेवफा, ऐतराज, कमबख्त ईश्क आणि अजनबी सारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे.

करिना-अक्षयच्या चाहत्यांसाठी 'बॅड न्यूज'
author img

By

Published : Apr 28, 2019, 8:39 AM IST

मुंबई - राज मेहता यांचं दिग्दर्शन असलेला 'गुड न्यूज' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजित दोसांज आणि कियारा अ़डवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होणार होता.

मात्र, आता अक्षय आणि करिनाच्या चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता २७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करण जोहर आणि अक्षय कुमार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दरम्यान अक्षय आणि करिनाने याआधीही तशन, बेवफा, ऐतराज, कमबख्त ईश्क आणि अजनबी सारख्या चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. तर दिलजित आणि करिनाने याआधी उडता पंजाब चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. आता त्यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.