मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम लवकरच आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बाटला हाऊस' असं त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव असून हा चित्रपट दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला असणार आहे.
काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यानंतर आता सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. क्या ये एनकाऊंटर फर्जी था? असा सवाल या पोस्टरवर केला गेला आहे. निखील अडवाणी यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
Trailer drops on 10 July 2019... John Abraham in #BatlaHouse... Directed by Nikkhil Advani... 15 Aug 2019 release. #BatlaHouseTrailerOn10thJuly pic.twitter.com/ZTtb0AMhC6
— taran adarsh (@taran_adarsh) July 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Trailer drops on 10 July 2019... John Abraham in #BatlaHouse... Directed by Nikkhil Advani... 15 Aug 2019 release. #BatlaHouseTrailerOn10thJuly pic.twitter.com/ZTtb0AMhC6
— taran adarsh (@taran_adarsh) July 8, 2019Trailer drops on 10 July 2019... John Abraham in #BatlaHouse... Directed by Nikkhil Advani... 15 Aug 2019 release. #BatlaHouseTrailerOn10thJuly pic.twitter.com/ZTtb0AMhC6
— taran adarsh (@taran_adarsh) July 8, 2019
२००८ मध्ये दिल्ली पोलीस आणि इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांच्यात चकमक झाली होती. यात आतिफ अमिन आणि महम्मद साजिद हे दहशतवादी ठार झाले, तर विशेष दलाचे निरीक्षक मोहन चंद शर्मा यांना वीरमरण आले. या सर्वादरम्यान विवादात अडकलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आणि त्या रात्रीची खरी बाजू या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार आहे.