लॉस एंजेलिस (यूएस) - व्हॅलेंटाईन डे कदाचित संपला आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रेमिंकांनी प्रेम करणे थांबवावे. रविवारी प्रियांकाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत प्रियंका कारमध्ये बसलेली असून ती तिचा नवरा आणि गायक निक जोनासचा हात धरताना दिसत आहे.
हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांसाठी काम करीत असलेल्या प्रियंकाने आपल्या कुटुंबासाठी व मुलीसाठी क्वालिटी टाईम घालवला. सोशल मीडियावर प्रियंका आणि निकने त्यांचा रविवार कसा घालवला याची झलक शेअर केली. फोटो शेअर करताना चोप्राने लिहिले, "माझा आवडत्या पध्दतीचा रविवार."
प्रियांका आणि निक नुकतेच आई वडील झाले आहेत. 22 जानेवारी रोजी दोघांनी इंस्टाग्रामवर सरोगेटद्वारे बाळाचा जन्म झाल्याची घोषणा केली होती. "आम्ही सरोगेटद्वारे बाळाचे स्वागत केले आहे हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे.'', असे त्यांनी मुलगी झाल्याचे सांगताना लिहिले होते.
कामाच्या आघाडीवर प्रियांका नुकतीच 'द मॅट्रिक्स रिझर्क्शन्स'मध्ये दिसली होती. 'एंडिंग थिंग्ज' या अॅक्शन फिल्ममध्ये ती अँथनी मॅकीसोबत काम करणार आहे. बॉलिवूडमध्ये ती आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफसोबत फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा - कथित 'लव्हबर्ड्स' हृतिक सबा आझादने एकत्र घालवला रविवार पाहा फोटो