मुंबई - मनोरंजन आणि कॉमेडी जगतात काही दिवसातच एक नवीन शो येणार आहे. हा शो कॉमेडीचे बादशाह अशी मनोरंजन क्षेत्रात ओळख असणारे राजू श्रीवास्तव हे सुरू करणार आहेत. ज्याचे नाव आहे 'हसते रहो विथ राजू श्रीवास्तव' असे आहे.
राजू श्रीवास्तव यांनी केली नव्या कॉमेडी शोची घोषणा -
मुंबईतील एका अलिशान हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात हसते रहो विथ राजू श्रीवास्तव या कॉमेडी शो संदर्भात राजू श्रीवास्तव यांनी घोषणा केली आहे. त्याचसोबत यावेळी या कॉमेडी शोच्या काही भागाचे चित्रीकरण देखील करण्यात आले. लवकरच हा कॉमेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येईल असे यावेळी राजू श्रीवास्तव यांनी सांगितले.
शोमध्ये घडेल भारतीय संस्कृतीचे दर्शन -
यावेळी राजू श्रीवास्तव असे म्हणाले की, सध्या टीव्हीवर दोन कॉमेडी शो चालत आहेत. ते प्रसिद्ध देखील आहेत. परंतु, आम्ही करणारा शो हा यापेक्षा वेगळ्या स्वरूपाचा असेल. सध्याच्या कॉमेडी शोमध्ये भारतीय संस्कृतीला दाखवले जात नाही तर आज कालचे शो हे फक्त शहरात होणारी कॉमेडीच दाखवतात. मात्र, आम्ही सुरू करणाऱ्या नव्या कॉमेडी शोमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडेल. यामध्ये भारतातील गाव, गावातील वेशभूषा दाखवली जाईल. हा शो दुसऱ्या कॉमेडी शोपेक्षा खूप वेगळा आणि एका नव्या स्वरुपात असेल.
या स्टारचाही असेल भाग -
या कॉमेडी शोमध्ये राजू श्रीवास्तव यांच्याशिवाय अतिथी म्हणून सुनंदा मिश्रा, संकेत भोसले, पारितोष, सुमेध यांच्यासह विविध व्हीआयपीही असतील.
कॉमेडी शो करणारे आमचा मित्र परिवार -
राजू श्रीवास्तव यांनी यावेळी सांगितले की, आमची कोणाशीही स्पर्धा नाही आहे. कारण की सगळे कॉमेडी शो करणारे हे आमचा मित्र परिवार आहेत.
कॉमेडीमध्ये या भुमिकाही पाहायला मिळतील -
हसते रहो विथ राजू श्रीवास्तव या कॉमेडी शोमध्ये गजोधर भईया, लालू यादव, मुलायम सिंह यादव आणि अमिताभ बच्चन तसेच राहुल गांधी या भूमिकेतीलही कॉमेडी पाहायला मिळेल.
कपिल होता शोचा दर्शक -
कपिल शर्मा यांच्याबद्दल राजू श्रीवास्ताव यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, कपिल आधी कधी आमच्या शोचा दर्शक होता आज तो स्वतःचा शो चालवत आहे.
यांचा आहे मुख्य सहभाग -
विकास प्रॉडक्शनचा बॅनरखाली हसते रहो विथ राजू श्रीवास्तव हा कॉमेडी शो बनवला जात आहे. ज्याचे प्रोड्यूसर हे सरला अशोक सरोगी आणि राहुल शर्मा तर डायरेक्टर हे राजू आहेत. तर, मुख्य अभिनेता म्हणून राजू श्रीवास्तव काम करणार आहेत.
हेही वाचा - आमिर खान तसेच किरण रावने घेतली जम्मू काश्मीरच्या गव्हर्नरची भेट