नवी दिल्ली - अभिनेत्री पायल घोष हिने मंगळवारी राष्ट्रीय महिला आयोगाच्या (एनसीडब्ल्यू) अध्यक्ष रेखा शर्मा यांची भेट घेऊन चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्याविरोधात दाखल केलेल्या खटल्यातील चौकशी अधिक गतिमान करण्याबाबत चर्चा केली. 'एनसीडब्ल्यूच्या प्रमुखांकडून तिला पाठिंबा मिळण्याचे आश्वासन मिळाले आहे,' असे बैठकीनंतर एका वृत्तसंस्थेशी बोलताना पायलने सांगितले.
'चौकशी कशा प्रकारे वेगवान करता येईल, यावर आम्ही चर्चा केली. रेखा मॅम पहिल्या दिवसापासूनच माझ्या बाजूने आहेत. त्यांनी मला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे,” असे पायल म्हणाली.
'आपण काम करू शकू आणि कोणतीही भीती न बाळगता आपल्या घरातून बाहेर पडू शकू,' यासाठी त्यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना आपण वाय-प्लस सुरक्षा देण्याची विनंती केली होती, असे तिने पुढे सांगितले.
अभिनेत्री रिचा चढ्ढाने तिच्यासह आणखी काही जणांविरुद्ध दाखल केलेल्या मानहानी खटल्याबद्दल बोलताना तिने 'मसान'मधील या अभिनेत्रीविरुध्द आपण काहीही बोललो नसल्याचे सांगितले.
हेही वाचा - अभिनेत्री तमन्ना भाटियाला कोरोनाची लागण, बरी होण्यासाठी चाहत्यांकडून शुभेच्छा
बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला कोरोनाची लागण झाली आहे.
'मी तिच्याविरोधात काहीही बोलले नाही. तिच्याविरोधात जाण्याचे मला वैयक्तिकरित्या काही कारण नाही. या मानहानीच्या खटल्याला आधार नाही. पण आम्ही याचा सामना करून आता स्पष्टीकरण देऊ,' असे पायल म्हणाली.
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री रिचा चड्ढाने पायल घोष आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याची सुनावणी 7 ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली आहे. प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आली नसल्यामुळे न्यायालयाने कार्यवाही पुढे ढकलली. रिचा चढ्ढाने पायल, आमोडा ब्रॉडकास्टिंग कंपनी, टीकाकार कमल आर. खान, जॉन डो / अशोक कुमार यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. पायलने दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात केलेल्या बलात्कार आरोप प्रकरणाविषयी बोलताना रिचासह इतर काही अभिनेत्रींना याच बाबीला सामोरे जावे लागल्याचा दावा केला होता.
हेही वाचा - लॉकडाऊनचा बोअरिंग पिरीयड संपवण्यासाठी येतोय मराठी सिनेमा 'फ्री हिट दणका'!