मुंबई - सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी याचा एशियन फिल्म टॅलेंट पुरस्काराने सत्कार होणार आहे. २१ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान या फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आलंय.
![Nawaz](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4989364_nawaz-2.jpg)
या पुरस्कार सोहळ्यासोबतच नवाजुद्दीन फेस्टीव्हलमध्ये प्रेक्षकांशी संवादही साधणार आहे. काही दिवसापूर्वी नवाजला कार्डिफ इंटरनेशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 'गोल्डन ड्रॅगन अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले होते.
![Nawaz](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/4989364_nawaz-1.jpg)
कामाचा विचार करता नवाजुद्दीन याचा 'मोतीचूर चकनाचूर' हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. यात त्याची भूमिका अथिया शेट्टीसोबत आहे.