मुंबई - नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'सीरियस मॅन' 2 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दलची चांगली मते सोशल मीडियावर ऐकायला मिळत आहेत.'सीरियस मॅन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीचे असे काही घडले, की ते तो काधीच विसरू शकणार नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी त्याच्या अभिनयाचे तोंडभरुन कौतुक केले होते. तो सामान्य लोकांसारखा दिसत असला तरी त्याची प्रतिभा अलौकिक आहे, असेही म्हटले होते.
नवाजुद्दीनने सांगितले की, ''सुधीर सर माझ्यासाठी गुरुसारखे आहेत. मी त्यांच्याकडे २० वर्षांपासून काम करण्याची वाट पाहत आहे. आशयघन चित्रपटाची निर्मिती करण्याचा त्यांच्यातील गुण कौतुकास्पद आहे. त्यांच्याबरोबर काम करण्याचा माझा अनुभव सर्वोत्कृष्ट होता. एके दिवशी जेव्हा आम्ही 'सीरियस' चित्रपटाच्या शूटिंगसाठी जात होतो तेव्हा त्यांनी एक भाष्य केले की मी त्यांना गर्दीचा एक भाग असूनही वेगळा वाटतो. मी कधीच आपला परफॉर्मन्स करताना अपयशी ठरत नाही. मला वाटते आजपर्यंतचे हे सर्वात मोठे कौतुक माझ्यासाठी होते. माझ्या करियरमध्ये मला खूप कौतुक मिळाले आहे, ते मी आयुष्यभर निभावेन.''
नवाजुद्दीन सिद्दीकी याने मांझी ते मंटो आणि ठाकरे ते ‘रात अकेली है’ या सारख्या चित्रपटातून असंख्य व्यक्तीरेखा पडद्यावर अक्षरशः जिवंत केल्या आहेत.