मुंबई - राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नागराज मंजुळेंच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्याच्या 'आटपाट' प्रॉडक्शनच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. ''घर- बंदूक- बिरयानी'' असे या चित्रपटाचे शीर्षक असेल. विशेष म्हणजे या चित्रपटात स्वतः नागराज भूमिका करणार असून 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे यांच्याही यात मुख्य भूमिका आहेत.
नागराजने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टिझर प्रसिध्द केला आहे. केवळ टेक्स्ट आणि व्हाईस ओव्हर असलेल्या या टिझरमध्ये चित्रपटाचे शीर्षक ''घर- बंदूक- बिरयानी'' ठळक दाखवण्यात आले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
एका गुढ संगीताने टिझरची सुरूवात होते. झी स्टुडिओज आणि नागराजची हा चित्रपट संयुक्त निर्मिती असणार आहे. या चित्रपटाचे संगीतकार आहेत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र. त्यांनी यापूर्वी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. 2022 मध्ये हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे.
हेही वाचा - ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ च्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने एक कोटी सबस्क्राइबर्सचा आकडा केला पार!