ETV Bharat / sitara

छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवणे हे स्वप्न - नागराज मंजुळे - musician duo Ajay Atul

नागराज मंजुळे यांनी सांगितले की त्या आगामी छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट कोरोनामुळे पुढे ढकलला गेला होता. 2019 मध्ये नागराज आणि रितेश देशमुख यांनी या विषावरील तीन चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती.

नागराज मंजुळे
नागराज मंजुळे
author img

By

Published : Mar 7, 2022, 2:45 PM IST

मुंबई - चित्रपट निर्माते नागराज मंजुळे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांवरील त्यांचा महत्त्वाकांक्षी बहुभाषिक त्रयी चित्रपटाचे काम कोरोना साथीच्या महामारीमुळे थांबले आहे. 2019 मध्ये नागराज आणि रितेश देशमुख यांनी या विषावरील तीन चित्रपट बनवणार असल्याची घोषणा केली होती. शिवरायांचा इतिहास उलगडणारी ही 'शिवत्रयी' दिग्दर्शक नागराज मुंजुळे, प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या संकल्पनेतून रूपेरी पडद्यावर अवतरणार होती.

या चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुखच्या मुंबई फिल्म कंपनी या बॅनरखाली करण्यात येणार होता. २०२१ मध्ये पहिला भाग रिलीज करण्याची तयारी त्यांनी केली होती. मात्र कोरोना साथीमुळे प्रोजेक्टला विलंब झाला आहे.

"साथीच्या रोगामुळे आमचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे आम्हाला दोन वर्षे वाया गेली, त्यामुळे साहजिकच आम्ही तो फ्लोवरवर शूटसाठी जाऊ शकलो नाही. पण असे नाही की चित्रपट रखडला आहे. हा एक प्रोजेक्ट आहे ज्याबद्दल मी खूप उत्कट आहे आणि एकदा सर्वकाही सुरळीत पार पडले की मी तुम्हाला सांगेन'', असे नागराज मुंजुळे यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

"फँड्री", "सैराट" सारख्या मराठी चित्रपटांनंतर आणि अलीकडेच प्रदर्शित झालेल्या "झुंड" या हिंदी चित्रपटानंतर चित्रपट निर्मात्याची सर्वात मोठी निर्मिती म्हणून या छत्रपती शिवाजी महाराजांवरील आगामी ऐतिहासिक प्रोजेक्टकडे पाहिले जात आहे.

"हा एक ऐतिहासिक आहे, आम्ही एक चित्रपट बनवत आहोत त्यामुळे चित्रपट बनवण्याचे नियम बदलणार नाहीत, फक्त विषय बदलतील. अर्थातच चित्रपटाच्या स्वरूपामुळे हे एक आव्हानात्मक काम असेल'', असेही नागराजने सांगितले.

शिवाजा महाराजांवरील चित्रपट बनवण्याचे स्वप्न असल्याचे नागराजने सांगितले. ''मी जेव्हा लहान होतो तेव्हा वाटायचे की शिवाजी महारांवरील सिनेमा किती भारी असेल. मी काही त्या विषयावरील सिनेमे पाहिले आहेत आणि मला एक बनवायचा आहे. हा माझी ड्रीम प्रोजेक्ट असेल'', असे नागराज म्हणाला.

नागराज मंजुळेचा नवीन "झुंड" हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. प्रेक्षक आणि समिक्षकांनी याचे भरपूर कौतुक केले आहे. यामध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन हे नागपूरचे निवृत्त क्रीडा शिक्षकाच्या भूमिकेत आहेत ज्यांनी झोपडपट्टीतील सॉकर चळवळीचा पुढाकार घेतला होता.

हेही वाचा - Ita 2022: रणवीर सिंग, राखी सावंतच्या मॅड एनर्जीने रेड कार्पेटवर वादळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.