ETV Bharat / sitara

माझे ॲक्शन सीन्सच माझ्यासाठी आहेत ‘आयटम सॉंग्स’ - जॉन अब्राहम! - जॉन अब्राहम मॉडेलिंग करत बॉलिवूडमध्ये पोहोचला

जॉन अब्राहम गाण्यांमधल्या नृत्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो. त्याबाबत सांगताना जॉन म्हणाला, ‘मला ॲक्शन करायला आवडते. इतक्या वर्षांत माझी बरीच हाडे तुटली आहेत तरीही हा माझा आवडता जॉनर आहे. प्रत्येक चित्रपटातून वेगळ्या प्रकारची ॲक्शन देण्याचा माझा प्रयत्न असतो. किंबहुना माझे ॲक्शन सीन्सच माझ्यासाठी ‘आयटम सॉंग्स’ आहेत, असेही तो म्हणाला.

जॉन अब्राहम
author img

By

Published : Feb 27, 2021, 7:59 PM IST

मुंबई - जॉन अब्राहम मॉडेलिंग करत बॉलिवूडमध्ये पोहोचला. प्रेक्षकांनी त्याला त्याच्या ॲक्शन चित्रपटांसाठी पसंती दिली व गेल्या काही वर्षांत जॉन ॲक्शन-थ्रिलर्स करताना दिसतोय. देखणे रूप, पिळदार शरीरयष्टी, हँडसम पर्सनॅलिटी आणि आपल्या कामाप्रती दिसणारी निष्ठा यामुळे जॉन अब्राहमचा खास चाहतावर्ग तयार झाला आहे. त्याचे ॲक्शन-पॅक्ड चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतात. तो अभिनयही चांगला करू लागलाय. पूर्वी त्याला अभिनयावरून चिडवलं जायचं, ‘फक्त हँडसम व्यक्तिमत्व आहे, ॲक्टिंग फारशी जमत नाही’ वगैरे बोललं जायचं. त्याला याबाबत विचारल्यावर तो हसून उतरतो, ‘हँडसम वाटतोय ना, मग काळजी नाही.’ असो. असा हा हँडसम आणि दहा जणांना लीलया लोळविणारा जॉन नृत्य म्हटलं आकसून जातो. तसंही ‘बल्की फिज़िक’ असणाऱ्यांच्यात नृत्याला लागणारी लवचिकता कमीच असते असं म्हटलं जातं.

जॉनला त्याच्या ‘शूटआऊट ॲट वडाळा’ मधील ‘मन्या सुर्वे’ च्या व्यक्तिरेखेने खूप प्रसिद्धी दिली. ‘माझे करियर मोठ्या पडद्यावर घडले. मी साकारलेला मन्या सुर्वे आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. सिंगल स्क्रीन असो वा मल्टिप्लेक्स, ॲक्शन-थ्रिलर्सना प्रेक्षक पाठिंबा देतात. त्यामुळेच माझा येणारा ‘मुंबई सागा’ सुद्धा चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला. हा किंवा असला चित्रपट मोठ्या पडद्यावर बघायलाच प्रेक्षकांना मजा येते. त्यामुळे त्यांना जे हवे ते आम्ही देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मुंबई सागा चा दिग्दर्शक संजय गुप्ता सोबत ॲक्शन चित्रपट करणे म्हणजे एक वेगळीच नशा आहे. मी तर त्याच्यासोबत काम करताना ‘ऑटो-पायलट मोड’ मध्ये असतो’ जॉन सांगत होता.

तर, जॉन अब्राहम गाण्यांमधल्या नृत्यापासून चार हात लांब राहण्याचा प्रयत्न करतो. त्याबाबत सांगताना जॉन म्हणाला, ‘मला ॲक्शन करायला आवडते. इतक्या वर्षांत माझी बरीच हाडे तुटली आहेत तरीही हा माझा आवडता जॉनर आहे. प्रत्येक चित्रपटातून वेगळ्या प्रकारची ॲक्शन देण्याचा माझा प्रयत्न असतो. या चित्रपटात एकदम ‘रॉ ॲक्शन’ आहे तसेच माझा पुढचा चित्रपट ‘अटॅक’ मध्ये ‘फ्यूचरिस्टिक ॲक्शन‘ आहे. मी या जॉनर मध्ये रमतो. काही ॲक्टर्स जसे डान्सिंग मध्ये रमतात वा त्यांना डान्स करायला आवडतो तसेच मला ॲक्शन करायला आवडते. ॲक्शन हाच माझा डान्स आहे. किंबहुना माझे ॲक्शन सीन्सच माझ्यासाठी ‘आयटम सॉंग्स’ आहेत.’

जॉन अब्राहम अभिनित ‘मुंबई सागा’ मध्ये जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, गुलशन ग्रोव्हर, रोहित रॉय, समीर सोनी, अंजना सुखानी, काजल अगरवाल आणि इम्रान हाश्मी यांच्या भूमिका असून संजय गुप्ता यांचे दिग्दर्शन आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, अनुराधा गुप्ता आणि संगीता अहिर निर्मित ‘मुंबई सागा’ येत्या १९ मार्च ला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे, तेव्हा जॉन अब्रॅहम चे ‘आयटम सॉंग‘ मिस करू नका.

हेही वाचा - ‘डान्स दिवाने’च्या मंचावर माधुरी दीक्षित थिरकली श्रीदेवीच्या गाण्यावर !

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.