मुंबई - बाहुबली चित्रपटाचा नायक प्रभासच्या 'साहो' चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूपच ताणली आहे. बराच काळ प्रभास सध्या काय करतोय, अशी चर्चा होती. भरपूर अॅक्शन आणि थ्रिल या चित्रपटात असेल याची ग्वाही बातम्यांमधून मिळत होती. अखेर चित्रपटाच्या टीझरने यावर शिक्कामोर्तब केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या चित्रपटातील अभिनेता प्रभासचा लूक जबरदस्त आहे. त्याची डोळ्याची पारणे फेडणारी अॅक्शन, चपळता आणि अभिनय नक्कीच वेड लावणार हे टीझर पाहून निश्चित वाटते. 'बागी' चित्रपटात भरपूर स्टंट केलेल्या अभिनेत्री श्रध्दा कपूरची यात भन्नाट अॅक्शन पाहायला मिळते. नील नितिन मुकेश, अरुण विजय आणि जॅकी श्रॉफ सारख्या कलाकारांची यात मांदियाळी पाहायला मिळते.
'साहो' चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवणारा हा ट्रेलर आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला 'साहो' प्रदर्शित होईल.