मुंबई - अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर त्यांचे चाहत्यांसह सर्व क्षेत्रातील कलाकार दुःखी आहेत. मुंबईतील चित्रकार रंजीत दहिया यांनी इरफान खान यांना अभिवादन करीत त्यांचे एक म्यूरल पेंटिंग बनवले आहे.
आपल्या आवडत्या कलाकाराला श्रध्दांजली देत रंजीत यांनी इरफान खान यांचे वरोडा रेडवर वॉल पेंटिंग बनवले आहे. वांद्र्याच्या बायलॉन्सवर त्यांनी हे चित्र रेखाटले आहे.
या पेंटिंगच्या मार्फत आपल्या आवडत्या कलाकाराला श्रध्दांजली वाहात असल्याचे रंजीत दहिया यांनी सांगितले. रंजीत म्हणाले, ''जेव्हा मला इरफान यांच्या निधनाची बातमी कळली तेव्हा मी त्यांना अभिवादन करायचे ठरवले होते.''
आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक कमावलेल्या इरफान खान यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी मुंबईत कोकिलाबेन रुग्णालयात २९ एप्रिलला निधन झाले.
इरफान खान यांचा 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट अखेरचा ठरला. त्याच्या प्रमोशनला ते येऊ शकले नव्हते.