ETV Bharat / sitara

सिद्धार्थ-परिणीतीच्या 'जबरिया जोडी'चं मोशन पोस्टर प्रदर्शित

author img

By

Published : Jun 29, 2019, 6:01 PM IST

आतापर्यंत तुम्ही अनेकदा सरप्राईज पार्टीबद्दल ऐकलं असेल, मात्र हे सरप्राईज लग्न आहे, अशी वाक्यं या मोशन पोस्टरमध्ये ऐकायला मिळतात. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि परिणीती एका लग्नाच्या वरातीत दिसत आहेत.

'जबरिया जोडी'चं मोशन पोस्टर प्रदर्शित

मुंबई - 'हसी तो फसी' चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा ही जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. 'जबरिया जोडी' असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं शीर्षक असून नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.

आतापर्यंत तुम्ही अनेकदा सरप्राईज पार्टीबद्दल ऐकलं असेल, मात्र हे सरप्राईज लग्न आहे, अशी वाक्यं या मोशन पोस्टरमध्ये ऐकायला मिळतात. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आणि परिणीती एका लग्नाच्या वरातीत दिसत आहेत. मात्र, यात नवरदेव खुर्चीवर बसला असून त्याला बांधून ठेवण्यात आलं आहे. तर त्याच्या गळ्यात दुल्हा नंबर ४६ असं फलक लावण्यात आलं आहे.

सिद्धार्थ आणि परिणीतीच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत सिंग यांनी केलं आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १ जुलै म्हणजेच येत्या सोमवारी प्रदर्शित केला जाणार आहे. तर हा चित्रपट २ ऑग्स्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

ent 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.