मुंबई - चित्रपट निर्माते मोहित सूरीने पुढच्या वर्षी ११ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटासह प्रेक्षकांना 'थ्रिलिंग रोलरकोस्टर राइड'चे आश्वासन दिले आहे.
"एक व्हिलन हा माझा पॅशन चित्रपट आहे. एक व्हिलन चित्रपटामुळे मिळालेल्या प्रेमामुळे मी आजही भारावलेला आहे.'एक व्हिलन रिटर्न्स'मुळे हे प्रेम आणखी वाढणार आहे. या चित्रपटाबद्दल जास्त काही मी आता उलगडून सांगू शकत नाही, पण हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना 'थ्रिलिंग रोलरकोस्टर राइड' असेल हे खात्रीपूर्वक सांगू शकतो.'', असे मोहित सुरी म्हणाला.
हा चित्रपट २०१४ च्या 'एक व्हिलन ' चित्रपटाचा सिक्वल आहे ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, श्रद्धा कपूर आणि रितेश देशमुख होते. नव्या चित्रपटाच्या कास्टची अधिकृतपणे अद्याप घोषणा झालेली नाही.
चित्रपटाची निर्मात्या एकता कपूर याबाबत म्हणाली, "या चित्रपटातून एक नाट्यमय अनुभव निर्माण करण्याचा हेतू आहे. सात वर्षांनंतर, एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट उत्तम आणि धडकी भरवणारा असेल!"
हेही वाचा - तापसी पन्नू आणि अनुराग कश्यप 'दोबारा'साठी पुन्हा आले एकत्र