मुंबई - अभिनेता अक्षय कुमार नुकताच 'मिशन मंगल' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. अशात आता हा सिनेमा महाराष्ट्रात करमुक्त करण्यात आला आहे.
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. मिशन मंगलनं आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १६८ कोटींची कमाई केली आहे. या सिनेमात अक्षय कुमारशिवाय तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, नित्या मेनन आणि क्रिती कुल्हारी या अभिनेत्रीही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
-
#MissionMangal declared tax-free [SGST] in #Maharashtra.
— taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#MissionMangal declared tax-free [SGST] in #Maharashtra.
— taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2019#MissionMangal declared tax-free [SGST] in #Maharashtra.
— taran adarsh (@taran_adarsh) August 28, 2019
मंगळ मोहिमेत महिला वैज्ञानिकांचे असलेले योगदान आणि त्यांच्या जीवनातील इतर समस्या बाजूला ठेवून या मिशनसाठी चाललेली त्यांची धडपड यात पाहायला मिळते. या सिनेमाने पहिल्याच दिवशी २९ कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट अक्षयच्या फिल्मी करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.