ETV Bharat / sitara

पाकिस्तान दौरा मिका सिंगला पडला महागात, सलमानच्या कॉन्सर्टमधून गच्छंती - Event

परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नात परफॉर्म करणे मिका सिंगला महागात पडले आहे. सलमान खानच्या अमेरिकेत होणाऱ्या इव्हेन्टमधून त्याला बाहेर पडावे लागले आहे.

मिका सिंग
author img

By

Published : Aug 26, 2019, 4:19 PM IST

मुंबई - जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा बहाल करण्यात आलेले कलम ३७० रद्द करण्यात आले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्याचा निर्णय केलाय तर भारतातील सिने क्षेत्रातील संघटनांनी पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातलीय. या दरम्यान गायक मिका सिंग याला पाकिस्तानात गायन करणे भलतेच महागात पडलं आहे.

मिका सिंग याने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जनरल परवेज मुशर्रफ यांच्या नातेवाईकाच्या लग्नात गायन केले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर फिल्म वर्कर्स युनियनने मिकावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. त्यानंतर मिकाने माफी मागत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. असे असले तरी सलमान खानने मात्र त्याला माफ केलेले दिसत नाही.

सलमान खानचा लाईव्ह इव्हेन्ट अमेरिकेत होणार होता. यातील गायकाच्या टीममध्ये मिका सिंगचे वर्णी लागली होती. हा इव्हेन्ट २५ ऑगस्टपासून सुरू होणार होता. मात्र हा इव्हेन्ट आता पुढे ढकलण्यात आलाय. मिळालेल्या माहितीनुसार यामध्ये मिका सिंगला वगळण्याचा निर्णय सलमानने घेतला आहे.

सलमानच्या किक चित्रपटात मिकाने "जुम्मे की रात है", बजरंगी भाईजान चित्रपटात "आज की पार्टी मेरी तरफ से" आणि सुल्तान या चित्रपटातील "लग गए 440 वोल्ट छूने से तेरे" ही गाणी गायली आहेत. मिका हा सलमानचा जवळचा मित्र मानला जातो. मात्र मिकाच्या देशप्रेमाबद्दल प्रश्न चिन्ह उभे राहात असल्यामुळे त्याला वगळण्याचा कटू निर्णय सलमानला घ्यावा लागलाय.

सलमान खानने अशा प्रकारचा निर्णय पहिल्यांदाच घेतलेला नाही. द कपील शर्मा शोची निर्मितीही सलमान करतो. या शोमधील नवज्योत सिंग सिध्दू याच्यावर पाकिस्तानात जाऊन पंतप्रधान इम्रान खान यांना भेटणे आणि सैन्य अधिकाऱ्यांशी गळाभेट घेणे यावरुन वाद निर्माण झाला होता. त्यानंतर द कपील शर्मा शोमधून सिध्दू यांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.