औरंगाबादेत शिक्षण घेऊन अभिनय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या मयुरी कांगो हिची गुगल इंडिया प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या निवडीने औरंगाबादेत कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केलाय.
मयुरीने अभिनयासोबत आपलं शिक्षणही सुरू ठेवण्याचा फायदा तिला झाल्याचे मत मयुरीची आई सुजाता कांगो यांनी व्यक्त केलं
घर से निकलते ही कुछ दूर चलते ही गाण्याच्या माध्यमातून घराघरात पोचलेली अभिनेत्री मयुरी कांगो ही मार्केटिंग क्षेत्राच्या उच्च पदावर विराजमान झाली. औरंगाबादची असलेली मयुरी कांगो 1995 मध्ये सिनेक्षेत्रात पदार्पण केलं. पापा कहते है या चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला एक वेगळी ओळख मिळाली. कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगो यांची ती मुलगी आहे.
अभिनय क्षेत्रात मनासारखं काम मिळत नसल्याने मयूरने आपला मार्ग बदलला. लग्न झाल्यानंतर काही वर्षे अमेरिकेत तिने एका कंपनीत काम केलं. काही वर्षांपूर्वी मयुरी मुंबईत दाखल झाली आणि मार्केटिंग क्षेत्रात आपलं काम सुरू केलं. तिच्या मेहनतीच्या बळावर तिला गुगल इंडिया प्रमुख पद देण्यात आल. तिच्या या यशामुळे तिच्या कुटुंबीयांत वेगळाच उत्साह दिसून आला.
मयुरीने अभिनय क्षेत्रावर अवलंबून न राहता आपले शिक्षण पूर्ण करत वेगळ्या क्षेत्रात मोठी भरारी घेतली. इतरांनीदेखील अभ्यास सुरू ठेवावा. आपलं शिक्षण न थांबता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करावी यश नक्की मिळेल, असा विश्वास मयुरीची आई सुजाता यांनी व्यक्त केला. आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी सुजाता कांगो यांच्याशी खास बातचीत केली आहे.