मुंबई: आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनी माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने सोमवारी ती एक कट्टर बुद्धिबळ प्रेमी असल्याचा खुलासा केला आहे. या खेळामुळे रणनिती आणि कल्पनाशक्तीची वाढ होत असल्याचे तिने सांगितले.
मानुषी आणि तिचे वडील मित्रा बसू छिल्लर यांना बुद्धिबळाचा खेळ आवडतो आणि पदार्पणातच ती अत्यंत स्पर्धात्मक बुद्धीबळाची कट्टरपंथी आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
"बुद्धीबळ रणनीती आणि कल्पनेच्या बाबतीत आपले मन आकर्षीत करते, कारण आपल्याला कोणत्याही किंमतीवर प्रतिस्पर्ध्याला खरोखरच चकवा द्यावा लागतो. माझ्या वडिलांबरोबर बुद्धिबळ खेळणे मला नेहमीच आवडडते, कारण मी जेव्हा त्यांच्यासोबत खेळते तेव्हा ते सर्वात अनाकलनिय, हुशार आणि तीक्ष्ण व्यक्ती आहेत." असं मानुषी म्हणाली.
बुद्धीबळाच्या माध्यमातून तिच्यात स्पर्धात्मकतेची भावना निर्माण केल्याबद्दल तिने तिच्या वडिलांचे आभार मानले आहेत त्यांच्यामुळे तिला नक्कीच तिच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत झाली.
मानुषीने सांगितले: "मी अत्यंत स्पर्धात्मक आहे आणि माझ्या वडिलांनी या गोष्टीला उत्तेजन दिले. या स्पर्धेत मला नेहमीच जिंकून द्यावे अशी त्याची इच्छा होती. मी बुद्धिबळाची एक चांगली साथीदार आहे आणि मला त्याच्याबरोबर खेळायला आवडते. कारण मी त्यांची मुलगी असूनही मला चुका करायला संधी देत नाहीत! "
हेही वाचा -बर्थडे स्पेशल: नसीरुद्दीन शहा यांच्या जबरदस्त अभिनय प्रवासाची झलक पहा
"हे निराशाजनक आहे आणि ते तितकेच रोमांचकारी आहे! ते तितकेच स्पर्धात्मक आहेत! त्यामुळे खेळ खूप मजेदार बनतो. आमच्याकडे अनेक नेलबिटर्स आहेत आणि मी असे म्हणू शकते की मी अजूनही त्यांच्याकडून शिकत आहे."
'पृथ्वीराज' या आगामी चित्रपटात मानुषी सुपरस्टार अक्षय कुमारच्यासोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित, 'पृथ्वीराज' हा चित्रपट राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे. यात अक्षय पृथ्वीराजची भूमिका करणार आहेत तर मानुषी संयोगिताची भूमिका साकारणार आहे.