मुंबई - अभिनेता मनीष पॉल याने वरुण धवन आणि कियारा अडवाणी यांच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या चित्रपटात निती कपूर आणि अनिल कपूर हेदेखील आहेत. हा चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली बनत आहे.
मनीषने कियारा, वरुण आणि राज मेहता यांच्यासह इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.
हेही वाचा - राजकुमार राव बनला परेश रावलसोबत 'शतरंज का खिलाडी'
त्याने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "माझी आई नेहमी म्हणते, जुग जुग जियो, हे तर होणारच होते. माझा पहिला दिवस, धर्मा प्रॉडक्शनसोबत माझा पहिल्या चित्रपटाचा पहिला दिवस. अनिल कपूर सर, नीतू मॅम, कियारा, वरुण, प्राजक्ता कोली आणि दिग्दर्शक राज मेहता यांच्यासमवेत स्क्रीन शेअर करण्यासाठी सुपर उत्साही आणि रोमांचित आहे."
हेही वाचा - तलावाच्या रेड आउटफिटमध्ये पोज देतानाचा सोनाक्षी सिन्हाचा फोटो व्हायरल