ETV Bharat / sitara

मंदिरा बेदीने घेतले चार वर्षीय मुलीला दत्तक - मंदिरा बेदी मुलगी न्यूज

अनेक सेलिब्रेटीजनी आतापर्यंत मुलांना दत्तक घेतले आहे. यात आता अभिनेत्री मंदिरा बेदीचाही समावेश झाला आहे. मंदिराने एका चार वर्षीय मुलीला दत्तक घेतले आहे. सोशल मीडियावर तिने याबाबत माहिती दिली.

madnira bedi
मंदिरा बेदी
author img

By

Published : Oct 26, 2020, 12:33 PM IST

मुंबई - अभिनेत्री मंदिरा बेदीच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. मंदिराने सोशल मीडियाच्या माध्यमातून या नवीन सदस्याचे स्वागत केले आहे. मंदिरा आणि तिचा चित्रपट निर्माता पती राज कौशल यांनी जुलै महिन्यात एका चार वर्षीय मुलीला दत्तक घेतले होते. त्याविषयी तिने आता माहिती दिली आहे.

मंदिरा आणि राज यांना वीर नावाचा एक मुलगा आहे. आता त्यांनी मुलीला दत्तक घेतले आहे. काल (रविवारी) मंदिराने आपल्या इन्टाग्राम अकाऊंटवर आपल्या कुटुंबासोबत एक फोटो पोस्ट करत मुलगी दत्तक घेतल्याचे सांगितले. पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, २८ जुलैला दाम्पत्याने मुलीला दत्तक घेतले. त्यांनी मुलीचे नाव 'तारा बेदी कुशल' असे ठेवले आहे.

२०१३ मध्येच केली होती मुलगी दत्तक घेण्याची तयारी -

फोटोमध्ये चार सदस्यांचे हे कुटुंब आनंदी दिसत असून त्यांनी सारखेच कपडे परिधान केले आहेत. मंदिरा आणि राज यांच्या लग्नाला 20 पेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. २०११ मध्ये मंदिराने मुलाला जन्म दिला होता व २०१३ मध्ये मुलगी दत्तक घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.