मुंबई - फिटनेस फ्रीक मलायका अरोरा ही बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर सक्रिय असते. मलायकाच्या सोशल मीडिया पेजवर दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळत असते. मलायकाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चाहत्यांसोबत विशेष गोष्ट शेअर केली आहे. खरंतर मलायकाने एका पोस्टद्वारे तिची सर्वात मोठी कमजोरी सांगितली आहे.
मलायका अरोराने बुधवारी रात्री एक पोस्ट शेअर केली. मलायकाने तिच्या इन्स्टास्टोरीवर ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये बेसनाचे लाडू आहेत, ज्याला मलायका अरोरा तिची सर्वात मोठी कमजोरी सांगत आहे. ही पोस्ट शेअर करत मलायकाने लिहिले आहे की, 'माझी सर्वात मोठी कमजोरी... बेसनचे लाडू'.
मलायकाने याआधी अर्जुन कपूरचा एक फोटो शेअर करत 'हे हॅण्डसम' असे लिहिले होते. या आधी अर्जुन आणि मलायका गुपचूप प्रेम व्यक्त करायचे, पण आता हे जोडपे सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाची उघड कबुली देत आहेत. दोघंही उघडपणे लंच आणि डिनर डेटवर जाऊ लागले आहेत. अर्जुन आणि मलायका दोघेही एकमेकांची काळजी घेतात आणि चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री आवडू लागली आहे.
अलीकडेच या जोडप्याच्या ब्रेकअपच्या बातम्यांनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. यातील काहीही खरे नाही हे सांगण्यासाठी अर्जुन कपूरला सोशल मीडियावर येणे भाग पडले. इतकेच नाही तर या अफवांच्या दरम्यान अर्जुन कपूरने मलायकासोबतचा त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून अटकळ झटपट खोडून काढली. नुकतेच हे कपल लंच डेटवर दिसले होते.
हेही वाचा - 'बधाई दो'सह एलजीबीटीक्यू+ नात्यावर आधारित बॉलिवूड चित्रपट