ETV Bharat / sitara

सुशांतचा 'दिल बेचरा' सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरावा : विद्युत जामवाल - highest watched film dil bechara

सुशांतसिंग राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. अभिनेता विद्युत जामवालने चाहत्यांना आवाहन केलंय की हा चित्रपट सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरावा. एक व्हिडिओ शेअर करुन त्याने हे आवाहन केले आहे.

Vidyut Jammwal
दिल बेचारा'चा ट्रेलर
author img

By

Published : Jul 6, 2020, 8:52 PM IST

मुंबई: सुशांतसिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट दिल बेचारा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. याच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार पुढे येत आहेत. अभिनेता विद्युत जामवालनेही इंडस्ट्रीतील इतर कलाकारांच्या वतीने दिल बेचाराच्या प्रमोशनचा निर्णय घेतलाय.

सोमवारी, दिल बेचाराचा ट्रेलर रिलीज होताच, विद्युतने ट्विटरवरुन त्याची लिंक शेअर केली आहे..

विद्युतने एक व्हिडिओ शेअर केला असून यात त्याने सुशांतचा शेवटचा चित्रपट सर्वाधिक पाहिलेला चित्रपट ठरावा अशी चाहत्यांना विनंती केली आहे.

'दिल बेचारा' हा चित्रपट २४ जुलै रोजी डिस्ने हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. हा चित्रपट हॉलिवूडच्या गाजलेल्या 'द फ़ॉल्ट इन अवर स्टार्स' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकेश छाबडा यांनी केले आहे.

हेही वाचा - सुशांतच्या अखेरच्या 'दिल बेचारा' चित्रपटाचा ह्रदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.