मुंबई - मुंबईतील उपनगर गोरेगाव येथे अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या अदिपुरुष या चित्रपटाच्या सेटवर मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. एका अग्निशमन दलाला किरकोळ दुखापत झाली. संध्याकाळी उशिरापर्यंत ही आग भडकली होती.
ही घटना घडली तेव्हा सैफ अली खान आणि प्रभास हजर नव्हते. अक्षय तर्टे (वय २४) हे अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. नंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. मंगळवारी बांगूर नगरातील इनॉर्बिट मॉल जवळील मोकळ्या मैदानावर खास सेट उभारण्यात आला होता. सायंकाळी ४:१० च्या सुमारास ही आग लागली, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱयाने दिली. त्यामध्ये आठ फायर इंजिने व सहा पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले होते.
सेटवर दिग्दर्शक ओम राऊत आणि एक लहान क्रू चित्रीकरण करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रभास आणि सैफ उपस्थित नव्हते, असेही ते पुढे म्हणाले. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही एक 'लेव्हल टू' आग म्हणून घोषित केली, जी मोठी मानली जाते.
टी-सीरिजची निर्मिती असलेला हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - वास्तविकता काल्पनिकतेपेक्षाही विलक्षण असते' हे दर्शविणारी क्राइम मालिका 'मौका-ए-वारदात'!