ETV Bharat / sitara

B'day Spcl: 'हे' आहे महिमाचं खरं नाव, 'परदेस'साठी घईंनी केलं होतं नामकरण

महिमाने परदेस या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तब्बल ३ हजार मुलींनी ऑडिशन दिली होती. दिग्दर्शक सुभाष घई यांनी यातून महिमाची निवड करण्यात आली होती

हे आहे महिमाचं खरं नाव
author img

By

Published : Sep 13, 2019, 10:38 AM IST

मुंबई - अभिनेत्री महिमा चौधरीचा आज वाढदिवस आहे. तिचा जन्म १३ सप्टेंबरला दार्जिलिंगमध्ये झाला. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी महिमा जाहिरातींमध्ये काम करायची. पेप्सीच्या जाहिरातीत तिनं ऐश्वर्या राय बच्चन आणि आमिर खानसोबत काम केलं होतं.

महिमाने परदेस या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तब्बल ३ हजार मुलींनी ऑडिशन दिली होती. दिग्दर्शक सुभाष घई यांनी यातून महिमाची निवड केली होती. या सिनेमात काम करण्याआधी महिमाचे खरे नाव रितू चौधरी असं होतं.

सुभाष घई एम हे अक्षर आपल्यासाठी लकी मानत होते. याच कारणामुळे त्यांनी रितू हे नाव बदलून महिमा ठेवलं. योगायोगाने हा सिनेमा हीट ठरला आणि रितूला पुढे महिमा या नावानेच ओळखले जाऊ लागले. या सिनेमासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यूचा फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाला होता. महिमाने दाग द फायर, धड़कन, दिल क्या करे, दीवाने, दिल है तुम्हारा, ओम जय जगदीश, बागबानसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.