हैदराबाद : तेलुगू चित्रपट 'पुष्पा-द राइज-पार्ट-1'चा दणदणाट बॉक्स ऑफिसवर अद्यापही सुरू आहे. अल्लू अर्जुनचा दबदबा आता केवळ दक्षिणेपुरता उरला नसून तो आता उत्तर भारतासह देशभर लोकप्रिय ठरत आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला असला तरी चित्रपटाची कथा, गाणे आणि संवाद लोकांच्या जिभेवर ठसले आहेत.
सध्या सगळीकडे अल्लू अर्जुनचे 'श्रीवल्ली' हे सुपरहिट गाणे आणि 'पुष्पा...पुष्पा मैं झुकेगा नहीं साला' ' या संवादाचे मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांचे मनोरंजन करत आहेत, पण 'पुष्पा' या चित्रपटात भूमिका करण्यास नकार देणार त्या कलाकारांबद्दल आपण जाणून घेऊयात. फिल्म इंडस्ट्रीत ६ असे कलाकार आहेत ज्यांनी 'पुष्पा'ला फ्लॉवर समजले पण पुष्पा 'फ्लॉवर' नाही तर 'फायर' आहे हे त्यांना आज कळून चुकले आहे.
महेश बाबू
![महेश बाबू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14269790_1.png)
'पुष्पा' चित्रपटाची मुख्य भूमिका यापूर्वी साऊथ सुपरस्टार महेश बाबूकडे गेल्याची बातमी आधीच पसरली होती. महेशने या चित्रपटामुळे त्याची स्क्रीन इमेज खराब होईल असे सांगून चित्रपटाला नकार दिला होता आणि इतकेच नाही तर त्याला त्याला चित्रपटाची कथा आवडली नव्हती. यानंतर हा चित्रपट अल्लू अर्जुनच्या झोळीत पडला आणि त्याचा परिणाम लोकांसमोर आहे.
सामंथा रुथ प्रभु
![सामंथा रुथ प्रभु](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14269790_5.png)
साउथ सिनेसृष्टीतील सुपरहिट अभिनेत्रींपैकी एक समंथा रुथ प्रभू 'पुष्पा' चित्रपटातील 'ऊं अंटावा' या आयटम नंबरमुळे खूप चर्चेत आहे. हे जाणून आश्चर्य वाटेल की या चित्रपटातील 'श्रीवल्ली' ही व्यक्तिरेखा रश्मिका मंदानाच्या आधी समंथाला ऑफर करण्यात आली होती, परंतु वैयक्तिक कारणांमुळे समंथाने चित्रपट करण्यास नकार दिला होता.
दिशा पटानी
![दिशा पटानी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14269790_4.png)
बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीचे नावही 'पुष्पा'च्या यशाशी जोडले गेले असते जर तिने या चित्रपटात 'ऊं अंटावा' हा आयटम नंबर केला असता. दिशाने ही गाणे नाकारल्यानंतर यासाठी सामंथाची निवड करण्यात आली.
हेही वाचा - Video : बर्फवृष्टीत 'जेसीबी'वरुन निघाली 'अजब वरात' !! पाहा व्हिडिओ
नोरा फतेही
![नोरा फतेही](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14269790_3.png)
सामंथाचे आयटम साँग 'ऊं अंटावा' करण्यापूर्वी ही भूमिका बॉलिवूडची हिट डान्सर गर्ल नोरा फतेही हिच्याकडेही गेली होती, परंतु नोराने या आयटम साँगसाठी मोठ्या रकमेची मागणी केली, ज्यामुळे तिला ही भूमिका सोडावी लागली.
विजय सेतुपति
![विजय सेतुपति](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14269790_2.png)
दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार विजय सेतुपती यांच्या अभिनयाचे सर्वांनाच वेड लागले आहे. बॉलिवूडमधील अनेक स्टार्सना त्याच्या अभिनयाची भुरळ पडली आहे, त्यात शाहरुख खानच्या नावाचाही समावेश आहे. 'पुष्पा' चित्रपटात अखेरच्या 15 मिनिटात खलनायक भंवर सिंगच्या व्यक्तिरेखेने धुमाकूळ घातलेला आहे. ही भूमिका विजय सेतुपतीला ऑफर झाली होती. परंतु त्याच्याकडे तारखा नसल्यामुळे त्याने नकार दिला आणि ही भूमिका मल्याळम अभिनेता फहाद फासिलच्या खिशात पडली. मिळालेल्या या संधीचे त्याने सोने केले असेच म्हणता येईल.
नारा रोहित
![नारा रोहित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14269790_6.png)
वृत्तानुसार, तेलगू स्टार नारा रोहितलाही चित्रपटाच्या टीमने खलनायकाच्या भूमिकेसाठी संपर्क साधला होता. खुद्द नारा रोहितने ही ऑफर नाकारली होती.
बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा'ची कमाई 'फायर' होऊन आगीच्या ज्वाळांप्रमाणे गगनाला भिडत आहे. या चित्रपटाने जगभरात 300 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि त्याचवेळी या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
हेही वाचा - आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवालच्या घरी लवकरच हलणार पाळणा