मुंबई - महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीसारख्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या महापुराने हाहाकार माजवला होता. आता पुराचं पाणी ओसरलं असलं, तरीही पुनर्वसनासाठी या पुरग्रस्तांना मदतीची गरज आहे. राज्यातील अनेक नागरिक त्यांना मदतीचे हात देत असतानाच कलाकारांनीही शक्य तितकी मदत करण्यास सुरुवात केली आहे.
रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन यांच्यापाठोपाठ आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि लता मंगेशकर हेदेखील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री मदत निधीमध्ये दिलेल्या २५ लाख रुपयांसाठी धन्यवाद आमिर खान, यासोबतच आदरणीय लता मंगेशकर यांचेही आभार, मुख्यमंत्री मदत निधीत ११ लाख जमा केल्याबद्दल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.