ETV Bharat / sitara

'हम आपके हैं कौन'ला बुधवारी 26 वर्षे पूर्ण, माधुरीने दिला आठवणींना उजाळा - 'हम आपके हैं कौन' सिनेसृष्टीतला मैलाचा दगड

सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या गाजलेल्या 'हम आपके हैं कौन' चित्रपटाला बुधवारी 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देताना माधुरीने सलमान आणि तिचे सिनेमातील काही फोटोंचे कोलाज शेअर केले आहे.

'हम आपके हैं कौन'
author img

By

Published : Aug 5, 2020, 3:28 PM IST

मुंबई: माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या अभिनयाने आजही चित्रपटप्रेमींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणाऱ्या 'हम आपके हैं कौन' चित्रपटाला बुधवारी 26 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट १९९४ मध्ये रिलीज झाला होता आणि आजही पाहताना तितकीच उत्कंठा प्रेक्षकांच्यात दिसून येते.

असा हा हिंदीतील क्लासिक चित्रपट हिंदी सिनेसृष्टीतला मैलाचा दगड ठरला होता. माधुरीने या चित्रपटाच्यावेळची मेहनत आणि मजेशीर किस्से आठवण्याचा प्रयत्न केला आहे. माधुरीने सलमानसोबतचा एक जुना फोटो शेअर केलेला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने “तेव्हा आणि आता” असे लिहिले आहे.

हा रोमँटिक चित्रपट पाहून अजूनही आनंद घेणाऱ्या अनेक चाहत्यांचे आभार मानत माधुरी दीक्षितने ट्विटमध्ये लिहिलंय, “तेव्हा आणि आता” असा विश्वास बसू शकत नाही # हम आपके है कौनची २६ वर्षे. त्यावेळी टीमने केलेली मजा मस्ती आणि मेहनत यामुळे प्रत्येक सीन परिपूर्ण होण्यास कोणतीही कसूर सोडली नाही.''

हा चित्रपट केवळ हिट नव्हता तर अनेकांसाठी तो प्रेरणादायक स्त्रोत होता. १९९० च्या दशकात या चित्रपटाने भारतीय विवाहसोहळ्यांमध्येही क्रांती घडवून आणली होती.

हेही वाचा - करिनाच्या नेपोटिझ्मच्या मतांवर कंगना टीमने साधला निशाणा

'हम आपके हैं कौन' हा चित्रपट 1982 साली आलेल्या 'नदिया के पार' या चित्रपटाचा मॉडर्न टेक होता. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई करणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता.

या चित्रपटाने १३ फिल्मफेअर पुरस्कार जिंकले, ज्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यांचा समावेश होता. माधुरी दीक्षित आणि सलमान खान या दोघांच्या करियरमध्ये हा ब्लॉकबस्टर चित्रपट एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

१९९४ मध्ये आलेल्या 'हम आपके है कौन'मध्ये माधुरीने निशा ही भूमिका साकारली होती, तर सलमानने प्रेम ही व्यक्तीरेखा साकारली होती. याचे दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केले होते. या कल्ट क्लासिकमध्ये मोहनीश बहल, आलोक नाथ आणि बिंदू हेही होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.