ETV Bharat / sitara

मुलगा १२ वी पास झाल्यामुळे माधुरी दीक्षितसाठी अभिमानाचा क्षण - माधुरी दीक्षितचा मोठा मुलगा अरिन

माधुरी दीक्षितने मोठा मुलगा अरिन बारावी पास झाल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे. सेलेब्रिशनसाठी सज्ज होतानाचा एक व्हिडिओही तिने शेअर केलाय.

madhuri-dixit-is-a-proud-parent
माधुरी दीक्षितसाठी अभिमानाचा क्षण
author img

By

Published : May 31, 2021, 10:23 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने मोठा मुलगा अरिन बारावी पास झाल्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट लिहून आनंद व्यक्त केला आहे.

अभिनेत्रीने रविवारी इन्स्टाग्रामवर लिहिलंय की, ''राम आणि माझ्यासाठी अभिमानाचा हा क्षण आहे, अरिन याने २०२१ मध्ये हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. यासाठी त्याचे अभिनंदन. हे वर्ष किती कठिण होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. लक्ष केंद्रीत करुन मेहनतीने त्याने हे यश मिळवलंय. भविष्यात तुझ्या यशासाठी शुभेच्छा. तुझ्यावर प्रेम निरंतर राहिल. पालक म्हणून तुझा अभिमान वाटतो.'', अशा आशयाची पोस्ट तिने लिहिली आहे.

अभिनेत्री माधुरीने एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. यात ती मुलगा पास झालाय याचा आनंद साजरा करण्यासाठी तयार होताना दिसते.

यावर्षी मार्चमध्ये माधुरीने मुलाचा १८ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली होती. यात तिने अरिना याला भविष्यात असलेल्या जबाबदारींची जाणीव करुन दिली होती.

हेही वाचा - महानायक अमिताभ बच्चन यांनाही श्री विठ्ठलच्या भक्तीचा लळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.