ETV Bharat / sitara

'लाईफ बियॉन्ड रिल' : अभिनेत्री ते लेखिका...ट्विंकलचा अनोखा प्रवास - अभिनेत्री ते लेखिका...ट्विंकलचा अनोखा प्रवास

'लाईफ बियॉन्ड रिल' हा ईटीव्ही भारत सिताराच्या लेख मालिकेचा एक भाग आहे. ज्या कलाकारांना चित्रपटात यश संपादन करता आले नाही, परंतु इतर क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली अशा कलाकारांबद्दल आपण माहिती घेणार आहोत. अभिनेत्री ट्विंकल खन्नाने अभिनयाचे क्षेत्र सोडले आणि एक लेखिका म्हणून नवी ओळख धारण केली आहे.

Journey of Twinkal Khanna
ट्विंकलचा अनोखा प्रवास
author img

By

Published : Dec 3, 2019, 9:19 PM IST

ट्विंकल खन्ना आता तिच्या 'पायजमाज आर फर्गिव्हिंग' या पुस्तकाच्या लॉन्चिंगसाठी सज्ज झाली आहे. ती जेव्हा जुहूच्या बंगल्यावर राहात होती तेव्हा घरातील कुकने तिला रात्रीच्या जेवणात काय करु? असा प्रश्न विचारला. तेव्ही ती म्हणाली की, ''आतमध्ये दिवसभर शॉर्ट्समध्ये अक्षय कुमार रिकामाच बसलाय त्याला का हा प्रश्न विचारल नाहीस? आज मी तयार होऊन निघत आहे तर तू मला हा प्रश्न विचारतोयस. आजही मला यासाठी गुंतायला हवे काय?''

पुस्तक लॉन्चिंगला बाहेर पडताना ट्विंकलने हा किस्सा सांगितला. उत्तम समज असलेली आणि शब्दांशी लडिवाळ खेळणाऱ्या ट्विंकलने विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. आपली मते मांडताना ती बिल्कुल कचरत नाही.

ट्विंकल सध्या २०१८ साठी सर्वाधिक खपाचे पुस्तक लिहिणारी लेखिका बनू शकते. सुपरस्टार राजेश खन्ना आणि अभिनेत्री डिंपल खन्ना यांच्या पोटी जन्मलेल्या ट्विंकलने कधीच आरामदायी आयुष्य जगायचे ठरवलेले नाही.

एका मुलाखतीत ट्विंकलने स्वतःला योध्दा म्हटले होते आणि चिंतीत व्यक्तीही म्हटले होते. एक यशस्वी अभिनेत्री न बनतादेखील तिने स्वतःचा एक वेगळा मार्ग निर्माण केला आहे. यासाठी ती स्वतःची पाठ थोपटते.

Journey of Twinkal Khanna as actress to Writer
ट्विंकल खन्नाने अभिनयाचे क्षेत्र सोडले आणि एक लेखिका म्हणून नवी ओळख निर्माण केली आहे.

ट्विंकलने १९९५ मध्ये 'बरसात' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचा शेवटचा चित्रपट होता 'तिस मार खान'. १५ वर्षाच्या कारकिर्दीत तिने आजवर १७ चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत. मात्र तिला या भूमिकांबद्दल बिल्कुल अभिमान नाही. या चित्रपटांवर बंदी घातली पाहिजे आणि हे चित्रपट तिचा मुलगा आरव आणि मुलगी नितारा यांनी पाहिले नाही पाहिजेत असेही तिला वाटते.

तिच्या अभिनयावर इतरांनी बोट उचलण्याआधीच ती स्वतःची मोठी टिकाकार आहे. ती म्हणते, ''मी एकही चित्रपट हिट दिलेला नाही. माझ्या सर्व चित्रपटांवर बंदी घातली पाहिजे म्हणजे ते कोणी पाहणार नाहीत.''

स्टार किड्स आणि अभिनेत्यांची लवकर कारकिर्द संपण्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र ट्विंकले स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री होण्यापासून दूर गेल्यानंतर एक आदर्श पत्नी आणि आई म्हणून तिने स्वतःला सिध्द केलंय. याशिवाय तिने स्वतःला इंटीरियर डिझायनर, स्तंभ लेखिका आणि लेखिका तसेच अद्योजिका म्हणूनही स्वतःला सिध्द केलंय. तिच्या लेखनाची सुरूवात वर्तमानपत्रांत लेख लिहिण्यापासून झाली. तिच्या ओघवत्या लेखणीने वाचकांची मने अल्पकाळातच जिंकली. तिचा उत्सफुर्तपणा आणि हजरजबाबीपणा वाचकांना भावतो.

ट्विंकल खन्नाने अभिनयाचे क्षेत्र सोडले आणि एक लेखिका म्हणून नवी ओळख धारण केली आहे.

ट्विंकल सध्या स्वतःच्या प्रॉडक्शन हाऊसची सहमालकीन आहे. अलिकडे गाजलेला ''पॅडमॅन' हा चित्रपट याच प्रॉडक्शनने बनवला होता. या वर्षीच्या सुरूवातीला तिने डिजीटल आणि सोशल मीडियाच्या मार्केटमध्ये प्रवेश करुन आपले पंख पसरले. महिला सक्षमी करणासाठी ती जागृती करीत असते. अनेक वादांना सामोरे जात ती आपल्या मतांवर ठाम असते. चमचमत्या दुनियेतून बाहेर पडून ती लेखनाच्या टेबलवर स्वतःला समाधानी मानते.

ट्विंकल म्हणते, "मी माझ्या मेंदूची काळजी घेत आहे. अखेरीस, मी अशा टप्प्यावर पोहोचेन जेथे दिसेनासे होण्यास सुरवात होईल आणि मला अल्झायमर येईपर्यंत माझ्या मेंदूवर अवलंबून राहावे लागेल आणि त्यानंतर माझ्यावर अवलंबून राहण्याचे काहीच नाही."

Intro:Body:

ent marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.