हैदराबाद : कोरोना व्हायरसनंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये मोठे चित्रपट प्रदर्शित होऊ लागले आहेत. अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटांच्या रिलीज तारखा जाहीर केल्या आहेत, त्यामुळे अनेक चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या शर्यतीत एकमेकांशी भिडले आहेत. अलीकडेच, लाल सिंग चड्ढाची (Lal Singh Chadha) नवीन रिलीज डेट समोर आली असून हा चित्रपट 14 एप्रिल रोजी रिलीज होत आहे. याच दिवशी अभिनेता यशचा KGF 2 हा चित्रपट रिलीज होणार आहे.
आमिर खान आणि करिना कपूरचा 'लाल सिंग चड्ढा' हा चित्रपट पुढील वर्षीच्या बैसाखीच्या मुहूर्तावर 14 एप्रिल 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. स्वत: करिना कपूर आणि चित्रपट निर्मात्याने सोशल मीडियावर नवीन पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. 'लाल सिंह चड्ढा'चे नवीन पोस्टर (New poster of 'Lal Singh Chadha') समोर येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
-
'LSC' VERSUS 'KGF2': THE BIGGG CLASH... 14 April 2022 will witness the clash of the two biggies: #LaalSinghChaddha and #KGF2... #AamirKhan versus #Yash. pic.twitter.com/JYvumuIUNi
— taran adarsh (@taran_adarsh) November 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">'LSC' VERSUS 'KGF2': THE BIGGG CLASH... 14 April 2022 will witness the clash of the two biggies: #LaalSinghChaddha and #KGF2... #AamirKhan versus #Yash. pic.twitter.com/JYvumuIUNi
— taran adarsh (@taran_adarsh) November 20, 2021'LSC' VERSUS 'KGF2': THE BIGGG CLASH... 14 April 2022 will witness the clash of the two biggies: #LaalSinghChaddha and #KGF2... #AamirKhan versus #Yash. pic.twitter.com/JYvumuIUNi
— taran adarsh (@taran_adarsh) November 20, 2021
चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना करिना कॅप्शनमध्ये लिहिलंय, "आमचे नवीन पोस्टर आणि नवीन रिलीज डेट शेअर (Lal Singh Chadha New Release date)करताना आम्हाला आनंद होत आहे. पोस्टरमध्ये करिना आमिर खानच्या खांद्यावर डोके टेकवताना दिसत आहे, दोघांच्या चेहऱ्यावरचे हास्य सांगत आहे की दोघेही प्रेमात आहेत. पोस्टरवर 'लाल सिंह चड्ढा' फक्त या बैसाखीला."
आमिर खानचा चित्रपट लाल सिंह चड्ढा 18 फेब्रुवारीऐवजी 14 एप्रिलला प्रदर्शित होत आहे. कन्नड स्टार यशचा KGF Chapter 2 या दिवशी रिलीज होत आहे. KGF च्या पहिल्या भागाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले होते, अशा परिस्थितीत आमिर खानच्या चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होऊ शकतो.
हेही वाचा - Three Agriculture Laws Repealed : तीन कृषी कायदे रद्द, बॉलिवूड सेलेब्रिटींनी व्यक्त केला आनंद