मुंबई - ‘भिगे ओठ तेरे ....’ म्हणत बॉलिवूड संगीतप्रेमी व गरुड गाजविणारा गायक कुणाल गांजावाला ( Kunal Ganjawala ) हिंदीसोबतच इतर अनेक प्रादेशिक भाषांतील गाणी रेकॉर्ड करीत असतो. नुकताच त्याने एक नवीन मराठी गाणं गायलंय जे दाक्षिणात्य बाजाचं आहे. बऱ्याच कालावधी नंतर सुप्रसिध्द बॉलीवुड गायक कुणाल गांजावाला ह्यांनी एक भन्नाट मराठी गाणं गायलं आहे. ‘भन्नाट पोरगी’ ( Bhannat Porgi Marathi Song ) हे गाणं 10 लाखांहून अधिक मराठी इन्फ्लुएन्सर असलेला अभिनेता निक शिंदेवर चित्रीत झालेलं आहे.
एस प्रॉडक्शन निर्मित, सचिन कांबळे दिग्दर्शित, ‘भन्नाट पोरगी’ हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. या गाण्याचं वैशिष्ठ्य म्हणजे मराठी, कोकणी, कन्नड अशा तीन भाषांचा मिलाफ ह्या गाण्यात पाहायला मिळतोय. गाण्याचे गीत-संगीत सुप्रसिध्द संगीतकार जोडी कुणाल-करण यांचे आहे. कुणाल गांजावाला आणि सोनाली सोनावणेने गायलेले हे गाणं निक शिंदे आणि सानिका भोईतेवर चित्रीत झालेले आहे.
एस प्रॉडक्शनचे निर्माते अजय अंकुश पाटील म्हणाले, ”’इसक झालं रं’ या रोमँटिक गाण्याला एक कोटींपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत. त्यामुळे दुसरं गाणंही धमाकेदार पद्धतीचं आणण्याचा विचार चालू असतानाच कुणाल-करणने मला ‘भन्नाट पोरगी’ हे गाणं ऐकवलं. आणि ऐकताक्षणीच पटकन ठेका धरायला भाग पाडणा-या या गाण्याची निर्मिती करायचा मी विचार केला.”
सुप्रसिध्द गायक कुणाल गांजावाला म्हणाले,”मराठी, कोकणी, कन्नडा अशा तीन भाषांचा मिलाफ असलेलं रोमँटिक गाणं आहे. नावाप्रमाणेच गाणं भन्नाट आहे. नवीन संगीतकारांसोबत गाण्याचा अनुभव खूपच चांगला होता.” गायिका सोनाली सोनावणे म्हणाली,”कुणाल गांजावाला ह्यांची मी फॅन आहे. ज्यांची गाणी ऐकत लहानाचे मोठे झालोय, त्यांच्यासोबत डुएट गाणं गाण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी अविस्मरणीय बाब आहे. कुणाल गांजावाला ह्यांच्यासोबत हे माझं पहिलंच गाणं आहे. सध्या साउथ गाण्यांची तरूणाईमध्ये क्रेझ आहे. त्यामुळे साउथ ठसक्याचं हे गाणं सर्वांना आवडेल, असा मला विश्वास आहे.”
कुणाल-करण ह्यांनी पहिल्यांदाच बॉलीवुड गायक कुणाल गांजावाला ह्यांच्यासोबत काम केलं आहे. त्या अनुभवाविषयी कुणाल-करण सांगतात, “साउथ इंडियन बाजाचं मराठी गाणं आहे, आणि सुप्रसिध्द गायक कुणाल गांजावाला ह्यांचा आवाज ह्या गाण्यासाठी चपखल बसेल असं वाटल्याने कुणालसरांना आम्ही संपर्क साधला. संगीतकाराला नक्की काय लकबी अपेक्षित आहे, त्याप्रमाणे गाण्याची कला त्यांच्यात अप्रतिम आहे.”
निक शिंदे गाण्याविषयी म्हणाला, “हा माझा सहावा म्युझिक अल्बम आहे. मी पहिल्यांदाच एवढा भन्नाट डान्स केलाय. गाण्यातल्या एका सिक्वेन्समध्ये मला लुंगी घालून डान्स करायचा होता. खरं तर, साउथ सिनेमांचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांना लुंगी घालून नाचताना पाहताना मलाही तसं नाचावसं वाटायचं. पण जेव्हा मला लुंगी घालून नाचायचं होतं तेव्हा मात्र मी खूप अवघडल्यासारखा झालो होतो. पण हे एवढं एनर्जेटिक गाणं करून खूप मजा आली.”
सानिका भोइटे म्हणाली, "मी ह्याअगोदर हुरपरी आणि रूप साजरं असे दोन म्युझिक व्हिडीयो केले होते. पण पहिल्यांदाच एवढा एनर्जेटिक डान्स नंबर केला. गाण्याचा अनुभव खूपच आठवणीत राहण्यासारखा होता."
भन्नाट पोरगी गाण्याचं दिग्दर्शन अनेक सुपरहिट म्युझिक व्हिडीयोचे दिग्दर्शक सचिन कांबळे यांनी केलंय. ते म्हणाले, ”दाक्षिणात्य ठेक्यावरचं मराठी गाणं असल्याने साउथ इंडियन मुलगी आणि मराठी मुलाची एक रोमँटिक लव्हस्टोरी ह्यात आम्ही चित्रीत केली. गाण्यात डान्स करताना खूप एनर्जीची आवश्यकता होती. त्यामुळे निक-सानिकाची निवड करण्यात आली.”
बॉलिवूड गायक कुणाल गांजावालाचं नवीन दाक्षिणात्य बाजाचं मराठी गाणं ‘भन्नाट पोरगी’! - भन्नाट पोरगी मराठी गाणे
सुप्रसिध्द बॉलीवुड गायक कुणाल गांजावाला ह्यांनी एक भन्नाट मराठी गाणं गायलं आहे. ‘भन्नाट पोरगी’ ( Bhannat Porgi Marathi Song ) हे गाणं 10 लाखांहून अधिक मराठी इन्फ्लुएन्सर असलेला अभिनेता निक शिंदेवर चित्रीत झालेलं आहे.