हैदराबाद (तेलंगणा): ओम राऊतच्या आदिपुरुष या पौराणिक चित्रपटात प्रभाससोबत बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन दिसणार आहे. सेटवर असताना अंतर्मुख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभासला बोलते करण्यात तिला यश आले आहे.
हिरोपंती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या क्रितीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या तेलगू चित्रपट नेनोक्कडाइनने केली होती. या चित्रपटात तिचा हिरो होता महेश बाबू. 2015 मध्ये आणखी एका तेलुगु चित्रपट दोहचय केल्या नंतर, क्रितीने तिचे लक्ष हिंदी चित्रपटसृष्टीतील करिअर घडवण्यावर पूर्णपणे वळवले. तिसा तेलुगु भाषेची ओळख मात्र उपयोगी पडली कारण तिने आदिपुरुष चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रभाससोबत गप्पा मारताना तिला याची मदत झाली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
प्रभाससोबत काम करण्याचा तिचा अनुभव सांगताना क्रिती म्हणाली : "प्रभास छान आहे. तो लाजाळू आहे असा माझा समज होता. आम्ही एका मोन्टाजसाठी शूटिंग करत होतो आणि त्यात कोणतेही संवाद नव्हते. म्हणून मी त्याच्याशी तेलुगुत बोलू लागले आणि तोही बोलू लागला. ओम (दिग्दर्शक) आश्चर्यचकित झाला की मी त्याच्याशी कसे बोलू शकले."
दरम्यान, क्रिती 2022 मध्ये पाच चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तिचे हे सर्व चित्रपट वेगवेगळ्या शैलीतील आहेत. यामुळे तिला आपली अभिनय क्षमता अजमावयाची संधी मिळत आहे.
आदिपुरुष चित्रपटाव्यतिरिक्त क्रितीकडे अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे, टायगर श्रॉफसोबत गणपथ, वरुण धवनसोबत भेडिया आणि कार्तिक आर्यनसोबत शेहजादा यासारखे अनेक मोठे चित्रपट आहेत.
हेही वाचा - Samantha On Oo Antava Success: 'ऊं ऊं अंटवा'साठी अल्लू अर्जुनचे सामंथाने मानले आभार