ETV Bharat / sitara

क्रितीच्या आयुष्यात खुललं प्रेम?, 'या' फोटोची होतेय चर्चा - Kriti Sanon Tatoo

क्रितीने या फोटोवर दिलेल्या कॅप्शनमुळेही या फोटोची चर्चा रंगली आहे.

Kriti Sanon flaunts with Tatoo on her shoulder, is the hint of love interest?
क्रितीने या फोटोवर दिलेल्या कॅप्शनमुळेही या फोटोची चर्चा रंगली आहे.
author img

By

Published : Mar 2, 2020, 12:31 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन मागच्या वर्षी 'हाऊसफुल ४' आणि 'पानिपत' चित्रपटात झळकली होती. सोशल मीडियावर तिची बरीच लोकप्रियता पाहायला मिळते. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. क्रिती नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. सध्या तिच्या एका फोटोची मात्र वेगळीच चर्चा रंगली आहे.

क्रितीने आपल्या पाठीवर 'V' अक्षर असलेला टॅटू गोंदवला आहे. या टॅटूसोबतचा एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या अक्षराने सुरुवात होणारी कोणती व्यक्ती क्रितीच्या आयुष्यात आहे, असे प्रश्न तिचे चाहते तिला विचारत आहेत.

हेही वाचा -फोटोग्राफर्सनी 'वहिनी' म्हणताच जेनेलियाच्या चेहऱ्यावर खुलले हसू, पाहा व्हिडिओ

क्रितीने या फोटोवर दिलेल्या कॅप्शनमुळेही या फोटोची चर्चा रंगली आहे. 'काहीतरी नवीन घडण्याची सुरुवात', असे कॅप्शन तिने या फोटोवर दिले आहे. त्यामुळे खरंच तिच्या आयुष्यात कोणाची एन्ट्री झालीये का, असा अंदाज नेटकरी लावत आहेत.

हेही वाचा -दलजीत दोसांझच्या 'त्या' फोटोवर इवांका ट्रम्पची मजेशीर प्रतिक्रिया

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, क्रिती लवकरच 'मीमी' या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 'मला आई व्हायचंय' या मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तसेच, अक्षय कुमारसोबत ती 'बच्चन पांडे' या चित्रपटात दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.