ETV Bharat / sitara

कियारा म्हणते, आयुष्यात एकदाच प्रेम झालं अन् आजही तो माझा खास मित्र - first love

कियारा म्हणते, मला आतापर्यंत एकदाच प्रेम झालं आणि तेदेखील शाळेत असतानाच. आजही माझ्या चांगल्या वाईट परिस्थितीबद्दल मी त्याच्यासोबत सगळं काही शेअर करत असते.

कियारा अडवाणी
author img

By

Published : Jun 21, 2019, 1:04 PM IST

मुंबई - एम.एस.धोनी फेम अभिनेत्री कियारा अडवाणी नुकतीच कबीर सिंग चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पहिल्याच नजरेत झालेल्या प्रेमापासून दूर जाण्याची वेळ आल्यानंतर होणारी परिस्थिती या चित्रपटात पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर नुकतंच कियारानं आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल खुलासा केला आहे.

मला आतापर्यंत एकदाच प्रेम झालं आणि तेदेखील शाळेत असतानाच. मला तरी असं वाटतं की मला एकदाच प्रेम होऊ शकतं. मी त्या मुलासोबतचं लहानाची मोठी झाले. आजही माझ्या चांगल्या वाईट परिस्थितीबद्दल मी त्याच्यासोबत सगळं काही शेअर करत असते, असं तिनं म्हटलं आहे.

दहावीत असतानाच मी त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होते आणि माझ्या आईने एकदा मला त्याच्यासोबत फोनवर बोलताना पकडलं होतं. तू आता दहावीला आहेस त्यामुळे त्या मुलासोबत बोलणं थांबव आणि अभ्यासावर लक्ष दे, असं आईनं आपल्याला सांगितल्याचं कियारानं म्हटलं आहे. पण माझा बॉयफ्रेंड स्वतःच हुशार असल्याने त्याच्यामुळेच मला जास्त मार्क मिळण्यास मदत झाल्याचेही कियारानं म्हटलं आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.